Modern High School Teachers
Modern High School Teachers sakal
पुणे

Pune News : विद्यार्थ्यांनी गुरुजनांना घडवली दुबईची सहल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जीवनाच्या वाटचालीत शिक्षकांनी केलेले संस्कार पावलोपावली कामी येत असतात. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्ष नोकरी किंवा व्यवसायात व्यस्त झाल्यानंतर काहींना आपल्या शिक्षकांचा विसर पडतो.

परंतु अनेक विद्यार्थी आजही आपल्या गुरुजनांना भेटून त्यांची विचारपूस करीत असतात. असाच सुखद धक्का पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमधील काही सेवानिवृत्त शिक्षिकांनी अनुभवला. शाळेतील माजी विद्यार्थी आणि उद्योजक राजेश बाहेती यांनी आपल्या शिक्षिकांना दुबईची सहल घडवून आणली.

जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलमधील १९८३-८४ मधील दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर आयोजित केले होते. सर्वजण तब्बल ४० वर्षांनी एकमेकांना भेटत होते. त्यावेळच्या शिक्षकांनी वयाची सत्तरी ओलांडली होती. या शाळेतील विद्यार्थी राजेश बाहेती यांनी आपल्या कर्तृत्वाने दुबईत स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे.

त्यांनी शिक्षकांना दुबईला येण्याचे आवाहन केले. त्यावर काही शिक्षकांनी सहलीला जाण्याची इच्छा दर्शवली. परंतु वैयक्तिक अडचणी, प्रकृतीच्या कारणास्तव काहीजणांनी सहलीचा बेत रद्द केला. उर्वरित सहा शिक्षिका तयार झाल्या. परदेशातील सहल म्हणजे पासपोर्ट, काहींचे पासपोर्टचे नूतनीकरण, व्हिसा या बाबी आल्या. दुबई दर्शन म्हणजे भरपूर फिरणे आले.

त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी शिक्षिकांना दररोज चालण्याचा सरावही करून घेण्यात आला. सर्वांना दुबईतील पर्यटन स्थळांचे दर्शन घडवून परत सुखरूप पोचविण्याची जबाबदारी बाहेती यांनी त्यांचे वर्गमित्र उद्योजक शैलेश जाधव यांच्यावर सोपविली.

बाहेती यांनी त्यांच्या दुबईतील ‘स्मना अल रफा’ हॉटेलमध्ये सर्वांची व्यवस्था केली होती. दुबईतील सहा दिवसांच्या मुक्कामात या शिक्षिकांनी सर्व पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. रेस्टारंटमधील लेबनीज जेवण, कोकोआ मेल्ट्स चॉकलेटचा आस्वाद, लिमोझीन कार आणि यॉट सफरीचाही रोमहर्षक अनुभव घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT