Students received knowledge of organic farming at Thoratwadi Zilla Parishad Primary School
Students received knowledge of organic farming at Thoratwadi Zilla Parishad Primary School 
पुणे

शाळेतच फुलवली परसबाग: विद्यार्थ्यांना मिळाले सेंद्रीय शेतीचे ज्ञान

सकाळवृत्तसेवा

टाकळी हाजी : कांदा, मुळा, भाजी I अवघी विठाई माझी II असे पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्याना नेहमीच मिळते. पण संकटात येत असणाऱ्या सेंद्रिय शेतीचे ज्ञान शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळू लागले आहे. या सेंद्रिय भाज्यांचा वापर मध्यान्ह भोजनात होत आसल्याने दुपारचे जेवनृ रुचकर बनत  आहे. मलठण( ता. शिरूर) येथील थोरातवाडी जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेतील शिक्षकांनी प्रयोग प्रत्यक्षात उतरवला आहे . मुळता शाळांना जागा कमी असते. त्यातून पिण्याच्या पाण्याची कमतरता भासते. शाळेतील कमी जागेचा वापर कल्पनेतून करत शेतीविषयक ज्ञान मिळू शकते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरातवाडी येथील मुख्याध्यापक युवराज थोरात व उपशिक्षिका  सरिता दंडवते यांनी परसबागेतून विदयार्थ्याना दाखवून दिले आहे. या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण झाली आहे. या शाळेत त्यांनी गेटसमोरच तुळशीची झाडे लावली आहेत. त्यामुळे वातावरण प्रसन्न होऊन ऑक्सिजनयुक्त राहण्यास मदत होते. या शाळेच्या परिसरात वड, फायकस, आंबा, चिकू, पेरू, बदाम, शेवगा, लिंबू, नारळ इ.झाडे लावली आहेत.

शाळेला कमी जागेची उपलब्धता असली तरी गेटच्या आत व वर्गाच्या पाठीमागे दोन गुंठे मोकळ्या जागेत परसबागेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातच खडकाळ जागेत काळी व लाल माती भरून वाफे करण्यात आले व त्यानंतर त्यातच कांदा, लसूण, मेथी, मुळा, भुईमुग ,कारले, दोडके,वालवड यांची लागवड करण्यात आली. विदयार्थी स्वतःहून या लागवडीत सहभागी झाले होते. पाटपाण्याने या परसबागेला पाणी व्यवस्थापन करण्यात आले होते.  सध्या या पिकांना बहर आला असल्याने मुलांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे.           

''सेंद्रिय शेती संकटात आली असून नवीन पिढिमध्ये सेंद्रिय शेतीचे संस्कार रुजविले पाहिजे. रासायनिक औषधांचा वापर न करता जेविक खते तयार करण्यास शिकवत आहे.''   
- युवराज थोरात, मुख्याध्यापक,  जिल्हा परिषद शाळा, थोरातवाडी

''विद्यार्थ्यांना कष्टाचे महत्व कळते. परसबागेतून उत्पादन होणारी सेंद्रिय पिके माध्यान्ह भोजणासाठी रुचकर ठरते. भविष्यात कमी पाण्यात पिकांचे उत्पादन शिकविणार आहोत.''
-  सरीता दंडवते, उपशिक्षिका, जिल्हा परिषद शाळा थोरातवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT