डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी
डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी 
पुणे

मराठी भाषेच्या बोलींमधील वैविध्याचा अभ्यास

नीला शर्मा

मराठी भाषेच्या विविध बोलींमधील वैविध्य, हा प्रा. डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी यांच्या अभ्यासाचा विषय आहे. एवढंच नाही तर यासंबंधीचं दस्तऐवजीकरण त्या आणि त्यांचे सहकारी करतात. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागातील ’ मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतीमांकन आणि आलेख’ या प्रकल्पांतर्गत हे महत्त्वाचं काम सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संस्थेच्या भाषाशास्त्र विभागप्रमुख या नात्याने बोलताना सोनलताई म्हणाल्या, ‘‘भाषेतील बोलींचा अभ्यास म्हटला की, अनेकांना तो वेगवेगळे शब्द, गाणी, म्हणी, वाक्‍प्रचार आदींचा संग्रह वाटतो. अनेक अभ्यासक असं संकलन करतात. संकलन, जतन महत्त्वाचं आहेच, पण व्याकरणिक रचना आम्ही आधारभूत मानल्या. अभ्यास पद्धतीला शास्त्रीय आधार असला पाहिजे. ब्रिटिश अभ्यासक जॉर्ज ग्रियर्सन यांनी अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठावीस दरम्यान मराठीच्या तीनशे चौसष्ट बोलींचं संकलन केलं होतं. ते एकोणीस खंडांमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर बोलींमधील बदल टिपण्याचं कार्य फारसं झालं नाही. ’’

सोनलताईंनी असंही सांगितलं की, मुंबईतील राज्य मराठी विकास संस्थेच्या अनुदानातून आमचा सध्याचा प्रकल्प जानेवारी वीसशे अठरामध्ये सुरू झाला. यासाठी बाराजणांच्या चमूला प्रशिक्षण देण्यात आलं. पंचवीस जिल्ह्यांतील एकशे एक तालुक्‍यांमधील सुमारे दोन हजार दोनशे पंच्याऐंशी मुलाखती यासाठी घेण्यात आल्या. चाळीस मिनिटं ते एक तास कालावधीच्या या मुलाखती ध्वनिचित्रमुद्रित स्वरूपात जतन केल्या आहेत. शहरी भागापासून थोड्या लांब अंतरावरील गावांमध्ये जाऊन हे काम करण्यात आलं. यात केवळ अशिक्षितच नव्हेत, तर शिक्षित आणि स्थलांतरितांच्याही बोलींच्या ध्वनिचित्रमुद्रणांचा समावेश असून भाषेतील बदल कसे घडत गेले, हे तपासून पाहण्यासाठी ते आवश्‍यक वाटलं. एकच गोष्ट वेगवेगळ्या वयोगटांतील स्त्री-पुरुषांच्या बोलीत ध्वनिमुद्रित केली. त्यातील बदलांचा अभ्यास करताना व्याकरणिक रचनांचा आधार घेतला आहे. आज अनेक अभ्यासकांकडे डेटा आहे, मात्र केंद्रीय पातळीवर सर्वांचा डेटा एकत्र करण्याची सोय उपलब्ध नसल्याने प्रत्येक अभ्यासक नव्याने डेटा गोळा करतो. आमच्या दस्तऐवजीकरणामुळे डेटाचा स्रोत सर्वांसाठी खुला करून दिला जाईल.

यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे. ग्रियर्सन यांनी ध्वनिमुद्रित केलेलं शंभर वर्षांपूर्वीचं मराठी ऐकण्यासाठी शिकागो युनिव्हर्सिटीत जावं लागायचं. आता कुणाही अभ्यासकाला हा येथेच स्रोत उपलब्ध असेल. या डेटाचा उपयोग मराठी भाषेसंबंधी धोरण आखणाऱ्यांना होऊ शकतो. भाषेच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना यातून नोकरी- व्यवसायासाठी नव्या संधी शोधता येतील. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT