Lovesh-Prabhu
Lovesh-Prabhu 
पुणे

तरुणींच्या स्वप्नांना मिळतंय पाठबळ - लोवेल प्रभू

अरुण सुर्वे

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेली ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ ही स्पर्धा शहरासह तरुणींच्या कलागुणांना वाव देणारी ठरली. ज्यांना काहीतरी बनण्याचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी ही स्पर्धा खरोखरच पाठबळ देणारी ठरली आहे, असे मत कोरिओग्राफर व या स्पर्धेचे दिग्दर्शक लोवेल प्रभू यांनी व्यक्त केले.

‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ या स्पर्धेविषयी प्रभू म्हणाले की, तरुणींचा व्यक्तिमत्त्वविकासासह त्या सर्वगुणसंपन्न होण्यासाठी; तसेच त्यांना व्यासपीठ मिळण्यासाठी मोठमोठ्या शहरांमध्येच अशा स्पर्धा होतात. मात्र, ‘सकाळ’ने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करून महाराष्ट्रातील तरुणींना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. विशेष म्हणजे आम्ही फक्त पुणेच नव्हे; राज्यातील आठ ते दहा शहरांमध्ये प्रत्यक्षात जाऊन तरुणींच्या ऑडिशन्स घेतल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामधून अंतिम फेरीसाठी २१ जणींची निवड करण्यात आली. त्यामुळे शहरी अन्‌ ग्रामीण भागातील तरुणींना यामध्ये संधी मिळाली.

या स्पर्धेमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, सामाजिक क्षेत्र, आर्किटेक्‍टसह नृत्य अन्‌ अभिनयातील तरुणींनीही सहभाग घेतला. विशेष म्हणजे मेहनत, टॅलेन्ट, सौंदर्याच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळातच आपल्याला काहीतरी करायचं असेल, तर तो रस्ता सोपा नसतो. मात्र, आपण स्वप्न बाळगून अन्‌ ध्येय निश्‍चित ठेवले तर नक्कीच ते साध्य करू शकतो. त्यामुळे यातील अनेक तरुणी चित्रपटसृष्टी, मालिका, जाहिरात अन्‌ मॉडेलिंगमध्ये पाहायला मिळतील, असा विश्‍वास प्रभू यांनी व्यक्त केला.

बेला शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार तर होतीच; त्याचबरोबर तिला कराटे, फोटोग्राफी, मॉडेलिंगचीपण आवड होती. तिने काल झालेल्या ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ स्पर्धेत आपला ठसा उमटविला. प्रथम क्रमांक मिळवून आई-वडिलांना एकप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान मिळवून दिला. ‘सकाळ’चा हा उपक्रम स्तुत्य आहे.
- संदीप लोळगे, मुख्य विजेती बेला लोळगे हिचे वडील

‘तुम्ही मिताली श्रीवास्तवच्या आई आहात ना?’ हे शीर्षक मला पु. ना. गाडगीळ आणि ‘सकाळ’च्या माध्यमातून लाभलं आहे. मी त्यांची खूप आभारी आहे. जेव्हा आपण पाहिलेली स्वप्ने आपली मुलगी पूर्ण करते, ती एक अनोखी भावना असते. त्याची अनुभूती मला आता आनंद देऊन गेली आहे. मितालीच्या यशाचा मला खूप अभिमान वाटतो.
- सुधा श्रीवास्तव, फर्स्ट रनरअप मिताली श्रीवास्तव हिची आई 

माझी मुलगी रिया हिला स्टेजवर पाहताना खूपच आनंद झाला. ती सेकंड रनरअप झाली आणि तिला ‘ब्यूटिफूल स्माइल’ हा टायटलही मिळाला. तिच्या या विजयाबद्दल आम्हाला आनंद वाटत असून, कौतुकही आहे. ‘सकाळ’चा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद असून, त्यामुळे तरुणींना योग्य वेळी व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
- वल्लभ जोशी, सेकंड रनरअप रिया जोशी हिचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT