चिंचवड - ‘सकाळ’ आयोजित स्वरसायलीनिर्मित ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव व सहयोगी विभागीय व्यवस्थापक हर्षद झोडगे यांच्यासमवेत सहभागी गायक, निवेदक व वादक.
चिंचवड - ‘सकाळ’ आयोजित स्वरसायलीनिर्मित ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव व सहयोगी विभागीय व्यवस्थापक हर्षद झोडगे यांच्यासमवेत सहभागी गायक, निवेदक व वादक. 
पुणे

कोजागरीच्या ‘स्वरपौर्णिमे’त न्हाले रसिक

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘चंद्र आहे साक्षीला...’, ‘चांदणे शिंपीत जाशी...’, ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी...’, ‘कधी तू रिमझिमणारी बरसात...,’ ‘गं साजणी...,’ ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...’, ‘उगवली शुक्राची चांदणी...,’ अशा एकाहून एक सरस गीतांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित व स्वरसायली निर्मित ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रमाचे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाचे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी प्रायोजक होते. ‘साजन मोहें घर आये’, ‘कमल सुख पाहे’ या पं. राजेंद्र कंदलगावकर यांच्या शास्त्रीय गायनाने सुरवात झाली. नूपुर मोरे यांनी ‘साजन माझे मन गाते’ या गाण्यावर नृत्यातून योगासने सादर करीत सर्वांची मने जिंकली. 

अक्षय घाणेकर यांनी ‘कधी तू रिमझिमणारी बरसात’ गीत सादर केले. त्याला मोबाईल टॉर्च लावून प्रेक्षकांनी दाद दिली. ‘म्हणत्यात हो पुण्याची मैना’ या सायली सांभारे यांच्या लावणीला प्रेक्षकांनी वन्स मोअर घेतला. गायक श्रीरंग भावे, गायिका शुभांगी सदावर्ते यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. वादक स्वप्नील जोशी, विवेक भालेराव, आदिती गराडे, ऋतुराज कोरे, निषाद शिधये यांनी साथसंगत केली. ज्ञानेश वाडेकर व रुपाली पाथरे यांनी निवेदन केले. 

‘फोटो ऑफ द डे’चे वितरण
नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी ‘जागर आदिशक्तीचा, उत्सव नवरंगाचा’ उपक्रम राबविला. त्याअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमधून ‘फोटो ऑफ द डें’ची निवड केली. त्या महिला समूहांचा गौरव आणि स्वरपौर्णिमेच्या कलाकारांचा सन्मान लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, सहायक विभागीय व्यवस्थापक हर्षद झोडगे यांच्या हस्ते केला. यात काळेवाडीतील सहेली ग्रुप, कासारवाडीतील गुरुकृपा बचत गट, वाकडमधील इंद्रधनू ग्रुप, मोशीतील नागेश्‍वर महिला प्रतिष्ठान, मोरवाडीतील श्रीसूक्त मोरजाई देवी ग्रूप, चिंचवडमधील श्रीसूक्त महिला मंडळ, दिघीतील इंदूबन रेसिडेन्सी ग्रूप, प्राधिकरणातील सखी ग्रुप यांचा समावेश होता. पीतांबर लोहार यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश म्हाकवेकर, जाहिरात विभागाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद भुजबळ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT