Corona1
Corona1 
पुणे

पुणे : उरळी कांचनमधील स्वीटहोमवालाच कोरोना पॉझिटिव्ह अन् मग...

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एका प्रमुख चौकातील स्वीटहोमवाल्याच्या मिठाईची चव आपण मागील चार दिवसात चाखली असली तर सावधान...मिठाईवालाच सोमवारी (ता. १३) कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. यामुळे स्वीटहोमवाल्याची मिठाई गोड लागली असली तरी, मिठाईवाल्याचा संपर्क मात्र शंभरहून अधिक जणांची झोप उडवणारा ठरण्याची शक्यता आहे.  

कंटेन्मेंट (प्रतिबंधित) झोन जाहीर झालेला असतानाही उरुळी कांचन येथील एका स्विटहोमवाल्याने ग्रामपंचायत कर्मचारी, स्थानिक पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन करत चार दिवसांपासून मिठाई विक्री सुरु ठेवली होती. पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनीही पोलिस ठाण्यात बोलावून स्वीटहोम बंद करण्याबाबत समज देण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस निरीक्षकांच्या सूचनेनंतरही हे स्वीटहोमचे दुकान सुरु होते. मात्र, अखेर कोरोनाने बंद पाडले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या, आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील त्या "प्रसिध्द" स्वीटहोमवाल्यासह पाचजण सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, मागील चार दिवसात स्वीटहोमवाल्याच्या संपर्कात आलेल्या 18 जणांची यांदी मिळाली असून, 18 जणांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी मंगळवारी (ता. १४) पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुचिता कदम यांनी दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागील दहा दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, सध्या उरुळी कांचन हद्दीत 40 हून अधिक कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी उरुळी कांचन हद्दीत बुधवार (ता. ८) पासून कंटेन्मेट (प्रतिबंधित) झोन जाहीर केलेला आहे. कंटेन्मेट (प्रतिबंधित) झोन जाहीर झाला असल्याने, गावातील सर्व व्यवहार बंद असताना हे स्वीटहोम मात्र सुरुच होते. स्वीटहोम बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गेले असता, स्वीटहोम मालकाकडून कर्मचाऱ्यांना दमदाटीही करण्यात आली होती. या दमदाटीची दखल घेऊन, खुद्द पोलिस निरीक्षक बंडगर यांनीही या प्रकरणात लक्ष घातले होते. मात्र, त्यानंतरही चोरुन मिठाईची विक्री केली जात होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या स्वीटहोम मालकाकडे उरुळी कांचन व परिसरातील अनेक 'माननीयां'ची उठबस असल्याने, स्वीटहोम मालकच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अनेकांची झोप उडाली आहे. तर मागील चार दिवसात या दुकानातून मिठाई खरेदी केलेले नागरिकही आपलाही नंबर तर लागणार नाही ना, या शंकेने गॅसवर आहेत. आरोग्य विभागाने स्वीटहोमवाल्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 12 हायरिस्क तर 6 कमी रिस्क अशा 18 जणांची यांदी बनवली आहे. मात्र, मिठाई खरेदी करणाऱ्यांवरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

(Edited By : Krupadan Awale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

SCROLL FOR NEXT