There is no shortage of water in Baramati taluka
There is no shortage of water in Baramati taluka 
पुणे

बारामती तालुका आता टँकरमुक्तीच्या दिशेने...

मिलिंद संगई

बारामती - पावसाने केलेली कृपा आणि लोकसहभागातून उभी राहिलेली जलसंधारणाची चळवळ या मुळे यंदा एप्रिल महिना सरत आला तरी टँकरची गरज लागलेली नाही. जलसंधारणाच्या झालेल्या प्रचंड कामामुळे बारामती तालुक्याची वाटचाल आता टँकरमुक्तीच्या दिशेने सुरु झाली आहे. 
वर्षानुवर्षे सर्वाधिक टँकर लागणारा तालुका म्हणून असलेला डाग लोकचळवळीतून लोकांनीच दूर करण्याचा ध्यास घेतला होता आणि त्याची फलश्रुती यंदा दिसू लागली आहे. 

यंदा टँकर नाही
गतवर्षी सरासरीहून अधिक पाऊस झाला आणि जलसंधारणाच्या कामातून हे पाणी अडून राहिले, जमिनीत मुरले, विहीरींच्या पाण्याची पातळी वाढली, त्या मुळे यंदा एप्रिल महिना सरत आला तरी टँकरची फारशी मागणी तालुक्यातून नाही. एरवी जानेवारीपासूनच टँकरची मागणी सुरु होते आणि एप्रिल मे महिन्यात त्याचा उच्चांक होतो. यंदा वातावरणच वेगळे आहे. 

चर्चा टंचाईची नाही जलसंधारणाची
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की टंचाईच्या चर्चा, बैठका आणि नियोजनाला वेग येतो. यंदा मात्र टंचाईच्या ना बातम्या आल्या ना चर्चा घडल्या, उलट जलसंधारण चळवळीत तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील सर्वच गावे उत्साहाने सहभागी झाल्याच्या बातम्या आल्या. ओढा रुंदीकरण व खोलीकरणाच्या बातम्यांनी तालुक्याचे चित्र बदलू लागल्याचा संदेश दिला गेला. 

जलसंधारणाची भरीव कामे झाली.. 
यंदा बारामती तालुक्यात शासन स्तरावर आणि लोकसहभागातून 17 गावात जलसंधारणाची 763 विविध कामे झाली. सकाळ रिलीफ फंडासह, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शरयू फाऊंडेशन, अजित पवार तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून तसेच पियाजिओ च्या सीएसआर फंडातून झालेल्या कामातून आठ हजार टीसीएम पाणी साठेल असा अंदाज आहे. गतवर्षी 16 गावातील 692 कामे पूर्ण झाली होती त्यातून 7558 टीसीएम पाणी साठणार असून आगामी वर्षासाठी 19 गावातील कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ओढा सरळीकरण व खोलीकरणाच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील 33 गावातील 221 कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे. या शिवाय कंपार्टमेंट बंडीग, शेततळी, सिमेंट नालाबांध, साठवण बंधारे, सलग समतल चर या सह इतरही अनेक कामे पूर्ण झाली. 

मानसिकताच बदलून गेली...
यंदा उन्हाळ्यात टँकर व टंचाईची नाही तर वॉटर कप स्पर्धेतील श्रमदान, ओढा रुंदीकरण खोलीकरण आणि प्रत्येक गावात होणा-या कामांच्या बातम्या झळकत आहेत. टंचाईवर मात करण्यासाठी लोकांनीच केलेले प्रयत्न यशस्वी ठरत आहेत याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. श्रमदानात केवळ ग्रामीण भागातीलच नाही तर शहरी भागातील लोकही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. माथा ते पायथा सुरु झालेली कामे त्याला नंतर मिळणारी यांत्रिक कामांची जोड या मुळे यंदाही चांगला पाऊस झाला तर त्याचा परिणाम पुढच्या उन्हाळ्यात नक्कीच जाणवणार आहे. 

जलसंधारण चळवळीतील आदर्श आता बारामती...
गेली अनेक वर्षे शिरपूर पॅटर्न, हिवरे बाजार या सह इतर गावांच्या प्रयत्नांची चर्चा व्हायची. आता मात्र बारामती तालुक्यातील लोकांनीच उत्स्फूर्तपणे गेल्या तीन वर्षात केलेल्या कामांचे परिणाम यंदाच्या उन्हाळ्यात दिसले आहेत. सरकारी सहभागापेक्षाही लोकसहभाग लक्षणीय दाखवित झालेल्या जलसंधारणाच्या कामाचा आता बारामती पॅटर्न तयार झाला आहे. गावाला असलेला टँकरचा डाग हटविण्यासाठी लोकच आता एकत्र झाल्याचे सुखद चित्र बारामती तालुक्यात दिसत आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT