Drown
Drown 
पुणे

जाधववाडी धरणात बुडून मुंबईतील तिघांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले.

देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून त्यांचे जावई, नणंद आणि भाची आले होते. ते सर्वजण रविवारी (ता. १९) सकाळी जाधववाडी धरणावर फिरण्यासाठी गेले. त्यांच्यातील काही जण धरणात उतरले. त्यातील अनिल कोंडिबा कोळसे (वय २८, रा. सीजीएस कॉलनी घाटकोपर, मुंबई) यांचा पाय घसरल्याने त्यांनी मागे उभे असलेले दादासाहेब पोपट गायकवाड तसेच प्रशील अमोल आढाव यांना पकडल्याने ते तिघेही धरणात पडले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करताना प्रीतेश रघुनाथ आगळे (वय ३२, नेव्हीनगर, नौसेना विहार, घाटकोपर मुंबई) हेही पाण्यात उतरले. मात्र, त्यांच्यासह चौघेही बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी संगीता दादासाहेब गायकवाड आणि त्यांची मुलगी उत्कर्षा गायकवाड गेल्या आणि त्याही बुडू लागल्या. त्या वेळी आरडाओरडा केल्याने धरणाजवळ काम करीत असलेले एनडीआरआरएफ केंद्रातील जवानांनी धाव घेतली. त्यांनी सर्वांना होडीतून बाहेर काढले व तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच प्रशील अमोल आढाव (वय ७), अनिल कोंडिबा कोळसे (वय २८) आणि प्रीतेश रघुनाथ आगळे (वय ३२, घाटकोपर, मुंबई) यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या बाबत तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. स्वप्नील दादासाहेब गायकवाड (वय २८, येलवाडी, ता. खेड, पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT