पुणे

चौकशी आयोग कोरेगाव भीमा परिसरात

CD

कोरेगाव भीमा, ता. ५ : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी राज्य सरकारने कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या द्विसदस्यीय चौकशी आयोगाने पेरणेफाटा विजयस्तंभ परिसर तसेच वढू बुद्रुक येथे भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली.
जानेवारी २०१८ मध्ये कोरेगाव भीमा व परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर या प्रकरणी राज्य सरकारने जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांचा द्विसदस्यीय चौकशी आयोग गठित केला. या चौकशी आयोगाने शनिवारी (ता. ५) पेरणे विजयस्तंभ परिसर तसेच वढू बुद्रुक परिसरात छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ परिसर, सभागृह, तसेच गोविंद गोपाळ गायकवाड समाधीस्थळासह सर्व ऐतिहासिक स्थळांची पाहणी करून पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी आयोगाचे वकील ॲड.आशिष सातपुते, विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस उपअधिक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, तसेच वढू बुद्रुकच्या सरपंच सारिका शिवले, सदस्या अंजली शिवले, राहुल कुंभार, ज्ञानेश्वर भंडारे, पोलिस पाटील जयसिंग भंडारे, माजी सरपंच अनिल शिवले, बापूसाहेब आहेर, पांडुरंग गायकवाड,उपस्थित होते.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सादर झालेले इलेक्ट्रॉनिक व कागदोपत्री पुरावे तसेच स्थानिक भौगोलिक स्थिती व गावपरिसरातील परिस्थितीचा समन्वय साधून नेमक्या वस्तुस्थितीच्या पडताळणीसाठी आयोगाने भेट दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान पांडुरंग गायकवाड यांच्याशी संवाद साधताना आपणास जे माहिती आहे त्याविषयी प्रतिज्ञापत्र करावे, असे आवाहनही पटेल यांनी केले.
KBM22B02869

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT