पुणे

मांडवगण येथे एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरीच्या घटना

CD

आंधळगाव, ता. १८ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे तीन वेगवेगळ्या घटनांत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी, असा पावणेदोन लाखांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार गुरुवारी (ता. १८) सकाळी सहा वाजता उघडकीस आला.
याप्रकरणी प्रभाकर रंगनाथ घाडगे (रा. मांडवगण फराटा- घाडगे तळई) यांनी मांडवगण फराटा पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या घटनेत घाडगे तळई येथील प्रभाकर घाडगे हे आपल्या घरी कुटुंबासह नेहमीप्रमाणे रात्री झोपले होते. बुधवारी रात्री अकरा ते गुरुवारी पहाटे साडेपाच यावेळेत चोरट्याने घराच्या कुलुपाचा कडी- कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व स्वयंपाक घरातील कपाटातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे, चार तोळे वजनाचा राणी हार, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, असा दोन लाख पासष्ट हजारांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार घाडगे यांच्या लक्षात आला. चोरटे चोरी करण्यासाठी ज्या दुचाकीने आले होते, ती चोरीची दुचाकी घाडगे यांच्या घराशेजारील शेतात सोडून ते पळून गेले.
दुसऱ्या घटनेत घाडगे तळई येथील रेखा शांताराम लोले या महिलेच्या घरातून रोख अठरा हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली. तिसऱ्या घटनेत दगडवाडी येथील वैभव चंद्रकांत फराटे यांच्या घरासमोर लावलेली बजाज कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच. १२ जी.जी. ३८७६) चोरून नेली.
याबाबतचा पुढील तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: कल्याण लोकसभेत सगळे रेकॉर्ड मोडा, गुलाल उधळायला मी स्वतः येणार!

Crime News : प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच भररस्त्यात प्रियकराला भोसकले

LED Screen Cleaning: घरगुती वस्तूंनी LED स्क्रीन करा स्वच्छ, फक्त करू नका 'या' चुका

Madgaon Express: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला 'मडगाव एक्सप्रेस'; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत

SCROLL FOR NEXT