पुणे

कोयता गँगच्या तीन जणांना आळंदीत पिस्तुलासह अटक

CD

आळंदी, ता. २ : पन्नास हजारांचे लोखंडी पिस्तूल आणि कोयता बाळगल्याप्रकरणी आळंदीत गुंडाविरोधी पथकाने तिघांना कोयता गँगच्या गुंडांना अटक केली. चार दिवसांपूर्वी पोलिसांनी अन्य तिघांना अटक करून चार पिस्तूल जप्त केले होते. यामुळे आळंदी परिसरात गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

सिद्धेश सीताराम गोवेकर (रा. चऱ्होली, ता. खेड), ज्ञानेश्वर बाळासाहेब पारवे (रा. गोपाळपुरा, आळंदी), यश शिवाजी भोसले (रा. दत्त मंदिर, आळंदी) या तिघांना अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन मुलाला गुन्हे करण्यास प्रवृत्त करून टोळी तयार करत असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. याबाबत गुंडाविरोधी पथकातील मयूर दळवी यांनी फिर्याद दिली आहे.

गस्त घालत असताना गुंडाविरोधी पथकाला खबऱ्यां‍कडून माहिती मिळाली, की गोवेकर हा दोन मित्रांसह केळगाव चौकात संशयास्पद हालचाली करीत आहे. पोलिस गोवेकरच्या दिशेने जात असताना त्या ठिकाणहून लगबगीने पळून जाताना तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तिघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांचे लोखंडी पिस्तूल आणि हजार रुपयांची दोन काडतुसे मिळाली. भोसलेकडे कोयता मिळाला, तर गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची बुलेट ताब्यात घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT