पुणे

आळंदीत बालहक्क संरक्षणाची रणनीती

CD

आळंदी, ता १० : धार्मिक शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी आणि बालहक्कांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार गठीत विशेष समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता. १०) आळंदी नगरपरिषद कार्यालयात पार पडली.
खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आळंदी व परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, दिघीचे निरीक्षक प्रमोद वाघ, ससून रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सचिन महाजन, आरोग्य अधिकारी आर. बी. ढाकणे, मुख्याध्यापक संतोष मरभळ, पोलिस उपनिरीक्षक डी. एस. जाधव, एम. एन. शेंडे, आळंदी नगरपरिषद समुदाय संघटक अर्जुन घोडे, समुदाय संघटक उपस्थित होते. प्रशासनामार्फत लवकरच या संदर्भात ''मानक कार्यपद्धती'' (एसओपी) तयार करण्यात येणार असून, सर्व संस्थांना त्याचे पालन करणे अनिवार्य असेल, असे बैठकीत ठरविण्यात आले .

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
''पॉक्सो'' कायद्याची संस्थांमध्ये प्रभावी व कडक अंमलबजावणी करणे.
सर्व संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक.
विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटी उपलब्ध करून देणे.
तज्ज्ञांमार्फत नियमित समुपदेशन करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

१२ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष! विद्यापीठाने ५ दिवसांत लावले १७ अभ्यासक्रमांचे निकाल; उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क, वाचा...

Panchang 30 April 2026 : आजचे पंचांग! नृसिंह जयंती, शुभ मुहूर्त आणि राहु काळ जाणून घ्या

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकावर पुन्हा लागणार बोली; बेस प्राईज ५ लाख, BCCI ची परवानगी, LSG ने एकही मॅच नाही खेळवली

SCROLL FOR NEXT