पुणे

आंबेगावात तहसीलदारांकडून नुकसानाची पाहणी

CD

पारगाव, ता. १९ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात शनिवारी (ता. १८) सायंकाळी झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
तालुक्याच्या पूर्वभागातील धामणी, लाखणगाव, खडकवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा, ज्ञानेश्वरवस्ती, द्रोणागिरीमळा या परिसराला शनिवारी सायंकाळी गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला. रस्ते, शेतात, गोठ्यात, घराच्या अंगणात गारांचा अक्षरशः खच पडला. गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहे.
रविवारी सकाळीच तहसीलदार रमा जोशी यांनी या सर्व गावांना भेट देऊन थेट नुकसान झालेल्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला. नायब तहसीलदार दामूराजे असवले, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक विभागाचे मंडल अधिकारी विश्वास शिंदे, तलाठी विशाल मुंगळे, कृषी सहायक प्रवीण मिर्के, कृषी सहायक निशा शेळके, कोतवाल विकास दाभाडे, कोतवाल सुभाष पंडित आदी यावेळी उपस्थित होते.
धामणी येथे सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव, अक्षय विधाटे, बढेकरमळा येथे श्याम बढेकर, संजय बढेकर, सुरेश विधाटे, सुरेश बढेकर, गोरक्ष विधाटे, लाखणगाव येथे पोलिस पाटील कल्पिता बोऱ्हाडे, शिरीष रोडे पाटील, पोंदेवाडी येथे उपसरपंच महेंद्र पोखरकर, अमोल वाळुंज, संदीप पोखरकर, जयसिंग पोंदे, सुशांत रोडे यांनी गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरु असतानाही रविवार सुट्टीचा दिवस असूनही महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी हे या पाहणी दौऱ्याच्या वेळी हजर होते. सर्व कर्मचाऱ्यांना गारपीटीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कामावर रुजू होण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
- रमा जोशी, तहसीलदार, आंबेगाव

विवेक वळसे यांच्याकडून पाहणी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावात शनिवारी सायंकाळी गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील वीज पुरवठा बंद पडल्याने सर्वत्र अंधार होता. या अंधारातही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी या भागाला भेट देऊन मोबाईलच्या उजेडात शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली व संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT