बावडा, ता. १३ : बावडा (ता. इंदापूर) परिसरात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसानभरपाईच्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या १८२ शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल, असे लेखी एक पत्र बावडा ग्राममहसूल अधिकारी यांनी दिल्याने शेतकऱ्यांनी येथील तलाठी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण बुधवारी (ता.१२) मागे घेतले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या मध्यस्थीने बावडा येथील तलाठी कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण व निषेध आक्रोश आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती शेतकरी आंदोलनाचे नेते पंडितराव पाटील व पवनराजे घोगरे यांनी दिली.
बावडा गावातील १८२ शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्याने वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी अखिल भारतीय मराठा सेवा संघ व शेतकरी संघर्ष समिती यांच्या संयुक्तपणे येथील तलाठी कार्यालयासमोर ‘आमरण उपोषण व निषेध आक्रोश’ आंदोलन शेतकऱ्यांनी सुरू केले. त्यानंतर दुपारी ग्राम महसूल अधिकारी विजय बोकडे यांनी लेखी पत्र आंदोलनकर्त्याना दिले.
यावेळी आंदोलनस्थळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी भेट दिली. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे, महादेव घाडगे, धैर्यशील पाटील, विजय गायकवाड, उमेश पाटील, उमेश शिंदे, धनंजय घोगरे, विजय घोगरे, विलास कवडे देशमुख विशाल घाडगे रणजीत गिरमे रणजीत घोगरे विक्रम घोगरे सह शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.