पुणे

नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

CD

भोर, ता. २६: पावसाचा जोर वाढल्यामुळे शनिवारी (ता. २६) नीरा धरण साखळीतील भाटघर व नीरा-देवघर धरण, गुंजवणी तसेच वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू सुरू आहे. त्यामुळे नीरा नदीला महापूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गुंजवणी, भाटघर आणि नीरा-देवघर या धरणांमधील पाणी नीरा धरण साखळीतील शेवटच्या वीर धरणात जाते. गुंजवणी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून अगोदरपासूनच २५० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. भाटघर धरणात शनिवारी सकाळी ९४ टक्के पाणीसाठा झाल्याने धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार ६३१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला. त्यामुळे वीर धरणाच्या अतिवाहक केंद्रातून एक हजार आणि सांडव्यातून चार हजार ४२८ असा एकूण पाच हजार ४२८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला. परंतु नीरा-देवघर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शनिवारी सायंकाळी ६ वाजता नीरा-देवघर धरणाच्या सांडव्यातून ३ हजार ४८४ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला. त्यामुळे वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

भाटघर धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचे परीक्षण
पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास भाटघर धरणावरील स्वयंचलित दरवाजांचे परीक्षण केले. भाटघर धरणाच्या ८१ दरवाजांपैकी ४५ दरवाजे स्वयंचलित आहेत. स्वयंचलित दरवाजांच्या परीक्षणामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात कितीही वाढ झाली तरी स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग योग्य रीतीने सुरू राहणार असल्याचे डुबल यांनी सांगितले.


05543

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shikhar Dhawan Video: 'एकतर चुकीच्या वेळी आणि ठिकाणी तू...' भारत - पाकिस्तान WCL सामन्याच्या प्रश्नावर शिखर भडकला

Trending News : शेवटी आई ती आईच... शेळीच्या पिल्लाला कुशीत घेऊन रोज दूध पाजते कुत्री, कहाणी ऐकून पाणावतील डोळे

'फ्रेण्डशिप डे'साठी रश्मिकाचा अनोखा उपक्रम, म्हणाली, '‘जीवनात प्रत्येक नात्याला दुसरी संधी...'

Weekly Horoscope 28 July to 3 August 2025: 'या' राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाईम, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Leopard Fish Ladghar : लाडघर समुद्रात आढळला बिबट्याच्या रंगाचा ‘मासा’, काय आहे खासियत

SCROLL FOR NEXT