घोडेगाव, ता. ८ : शिनोली (ता. आंबेगाव) येथे स्ट्रॉबेरी उत्पादन तंत्रज्ञान, काढणीपश्चात तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन या विषयावर नुकतेच प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, प्रकल्प संचालक आत्मा, पुणे व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम स्ट्रॉबेरी उत्पादन तंत्रज्ञानाचे धडे शेतकऱ्यांना देण्यात आले.
एक दिवसीय प्रशिक्षणासाठी राजगुरुनगर येथील उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील उद्यानविद्या विषयतज्ज्ञ भरत टेमकर, पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे, गृहविज्ञान विषयतज्ज्ञ निवेदिता शेटे, आंबेगावचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, फळे निर्यातदार जयसिंग धोरवे, जपानमधील असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ जपानचे प्रतिनिधी समीर खाले व एम २ लंबो भारत प्रा. लि.चे देवांग ओझा, जिल्हा परिषद सदस्य जनाबाई उगले, संजय गवारी, आयसीआयसीआय फाउंडेशनचे नितीन गुत्व, रामचंद्र बारवे, पारधी, रोहिदास विरणक, उत्तम लोहकरे तसेच परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या निर्यातक्षम स्ट्रॉबेरी उत्पादन व काढणीपश्चात तंत्रज्ञान या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्याचे भरत टेमकर यांनी स्ट्रॉबेरी उत्पादन तंत्रज्ञानावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र बारवे यांनी केले.
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी शंकर कंगले, अश्विनी उमे आदींनी मनोगत व्यक्त केले. कृषी सहाय्यक अरविंद मोहरे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. आभार मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र बारवे यांनी मानले.
जपानमध्ये सुझुकी कंपनीच्या सहकार्याने स्ट्रॉबेरी उत्पादन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याची मोहीम आम्ही हाती घेत आहोत. लवकरच भीमाशंकर आदिवासी परिसरातील मृदा सर्वेक्षण करून जमीन आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने काम चालू करणार आहोत.
- देवांग ओझा, एम २ लॅबो भारत प्रा. लि.
03901
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.