काटेवाडी, ता. ५ : बोगस बियाण्यांचा धोका शेतकऱ्यांना नेहमीच असतो. यावर उपाय म्हणून यंदाच्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने ‘साथी’ पोर्टलवर बियाणे नोंदणी अनिवार्य केली आहे. यंदा साती पोर्टलवर ७० हजार क्विंटल बियाणे नोंदणीकृत केले असून ते ट्रेसेबल आहे. पुढील वर्षापासून १०० टक्के बियाणे पोर्टलवर नोंदणीकृत होईल, असे राज्य शासनाने सांगितले आहे. त्यामुळे बोगस बियाणांमुळे फसवणूक होणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात साथी पोर्टलचा फायदा होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तरीही यावर्षी १०० टक्के बियाणांची नोंदणीसाठी पोर्टलवर झाली नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी करताना तसेच बियाणे खरेदी करताना देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बियाण्यांच्या गुणवत्तेची हमी देणारा ‘साथी’ पोर्टल हा एक उपक्रम आहे. राज्य शासनाने बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘साथी’ पोर्टलवर बियाणे नोंदणी बंधनकारक केली आहे. सध्या ७० हजार क्विंटल बियाणे या पोर्टलवर नोंदणीकृत असून, ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे. पुढील वर्षापासून सर्व बियाणे या पोर्टलवर नोंदले जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि दर्जेदार बियाणे मिळतील. बियाण्यांच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारींच्या बाबतीत जबाबदार व्यक्ती ओळखणेही सोपे होईल.
‘साथी’ पोर्टलचे फायदे
‘साथी’ पोर्टल शेतकऱ्यांना बियाण्यांची मूळ माहिती, गुणवत्ता आणि पुरवठादाराचा तपशील उपलब्ध करून देते. यामुळे बियाणे खरेदी करताना पारदर्शकता वाढते आणि बनावट बियाण्यांचा धोका कमी होतो. गेल्या आणि चालू वर्षीच्या मागणीच्या आधारे राज्य शासनाने मॉन्सूनपूर्वी बियाणे आणि खतांचे नियोजन केले आहे. स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य वाण निवडण्यासाठी पोर्टलवरील माहिती उपयुक्त ठरेल.
पेरणी करताना घ्यावयाची काळजी....
* पेरणीपूर्वी पिशवीच्या तळाला छिद्र करा आणि माहितीचे टॅग जपून ठेवा.
* रिकामी पिशवी आणि थोडे बियाणे पावतीसह साठवा. जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेरणी करा आणि तारीख नोंदवा.
* बियाण्यांच्या उगवणीत अडचण किंवा गुणवत्तेची तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पावतीसह तक्रार नोंदवा.
बियाणे खरेदी करताना काय पाहाल?
* बियाणे खरेदी करताना नेहमी परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करा.
* खरेदीची पक्की पावती घ्या. त्यावर पिकाचे नाव, जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचा पत्ता आणि विक्रेत्याची सही असावी.
* बियाण्याच्या पिशवीवरील माहिती नीट तपासा. यात उगवण क्षमता (टक्केवारी), भौतिक शुद्धता आणि चाचणीची तारीख असते.
* केवळ प्रमाणित बियाणेच घ्या. कृषी विभाग, विद्यापीठे किंवा मान्यताप्राप्त खासगी संस्थांनी प्रमाणित केलेले बियाणे निवडा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणि उत्पन्न वाढते.
* पिशवीवर उत्पादन तारीख आणि वैधता मुदत तपासा. जुने किंवा कालबाह्य बियाणे घेऊ नका. तुमच्या भागातील हवामान, जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यानुसार योग्य वाण निवडा. स्थानिक परिस्थितीला अनुकूल वाणच उत्तम ठरतात.
* पिशवीवरील इतर माहिती, जसे की उत्पादक संस्था, बियाण्याचे उत्पादन वर्ष, कीटकनाशक किंवा बुरशीनाशक प्रक्रिया, याची खात्री करा. कमी किमतीपेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्या. फसव्या सवलती आणि खूपच स्वस्त बियाण्यांपासून सावध रहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.