manchar market committee election voting today
manchar market committee election voting today  sakal
पुणे

Market Committee Election : मंचर बाजार समितीसाठी चार ठिकाणी मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेवा

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी झाली असून, आंबेगाव तालुक्यात डिंभे, घोडेगाव, मंचर व निरगुडसर या चार मतदान केंद्रामध्ये मतदान होणार आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक (सहकार) पी. एस. रोकडे यांनी केले.

एकूण १५ संचालक पद जागांसाठी निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत व सोसायटी मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र आहेत. शुक्रवारी सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. सोसायटी कृषी पतसंस्था गट- सर्वसाधारण दोन जागा, महिला एक जागा, इतर मागास प्रवर्ग जागा, अनुसूचित जमाती एक जागा असून, सोसायटीची मतदार संख्या ७२० आहे.

ग्रामपंचायत मतदार संघ- सर्वसाधारण दोन जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल,अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी एक जागा असून, मतदार संख्या ८३८ आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात शनिवारी (ता. २९) सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. मतदान व मतमोजणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी रोकडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT