पुणे

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त नारायणगावात कार्यक्रम

CD

नारायणगाव, ता. १२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नारायणगावमध्ये सर्व युगप्रवर्तकांची संयुक्त जयंती आयोजित केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बिंबाजी वाव्हळ यांनी ही माहिती दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगाव येथील श्री. मुक्ताई मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहा वाजता महापुरुषांची संयुक्त जयंती आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. अमोल कोल्हे असणार आहेत. या वेळी आमदार अतुल बेनके, ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, माजी सरपंच योगेश पाटे आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी यशवंत गोसावी यांचे ‘भारतीय संविधान, लोकशाही आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या वेळी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शिवाजी सोनवणे, डॉ. सुहास कांबळे, अलकाताई फुलपगार, प्रा. राधाकृष्ण गायकवाड, लेणी व धम्म लिपी अभ्यासक सुनील खरे, लक्ष्मी प्रल्हाद जोशी, मेहबूब काझी, संगीता डोंगरे, के. बी. वाघमारे, वसंत अवसरीकर, डॉ. अनुष्का शिंदे यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT