पुणे

गांजा वाहतूक करणाऱ्यांना आमदाबाद येथे बेड्या

CD

शिरूर, ता.२६ : शिरूर-मलठण रस्त्यावरील आमदाबाद फाटा येथे शुक्रवारी (ता.२५) रात्री पोलिसांनी गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत असलेल्या दोन तरुणांना रंगेहाथ पकडले. विजय बबन काळे (वय २९) आणि शुभम शंकर मोहिते (वय २५, दोघे रा.टाकळी हाजी, ता.शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आमदाबाद फाटा येथे शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास मळगंगा मंगल कार्यालयाजवळ पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून चार किलो गांजा आणि दुचाकी (एम एच‌१६ ई ८८९०) असा एकूण ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार तुषार पंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT