पुणे

केळी बागांना ३० लाखांचा फटका

CD

पिंपळवंडी, ता.२३ : उंब्रज (ता.जुन्नर) परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या २० एकर क्षेत्रातील केळी बागांचे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातील दत्तात्रेय प्रभाकर हांडे, बाळासाहेब प्रभाकर हांडे, जयश्री शशिकांत हांडे, तान्हाजी बाळशीराम हांडे, बाबूराव भीमाजी नलावडे, विशाल वसंत शिंगोटे, पोपट वामन चौधरी, प्रणीत हांडे, प्रणय हांडे या उंब्रज व काळवाडी शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे केळी बागांचे तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या राज्यात सगळीकडे पाऊस सुरू असून सोमवारी उंब्रज परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतांमध्ये तसेच रस्त्यांवर सगळीकडे पाणी जमा झाले होते. रस्त्यांवर झाडे कोसळली होती.

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, ओतूरचे मंडल कृषी अधिकारी प्रवीण नंदकुळे, तलाठी नितीन लांडे, सहायक सुनील आल्हाट, पोलिस पाटील राहुल हांडे यांनी घटनास्थळी येऊन नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली. यावेळी सरपंच हिरामण शिंगोटे, सुनील वामन, तान्हाजी हांडे उपस्थित होते. लवकरात लवकर शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शासनाने प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणी करावी, केळी पीक विमा बाबतीत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. केळी बागेच्या भोवती वारा विरोध यामध्ये शेवरी, गजगवत इत्यादी चारा वर्गीकरण वनस्पत चे कूंपन करावे. यामुळे ऊन वारा, पाऊस व थंडी मुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी होण्यासाठी मदत होईल.
-अजय बेल्हेकर, डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी

02462

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: परळीत आणखी एक खून प्रकरण! बालाजी मुंडेंची हत्या कुणी केली? खरा खुनी सोडून ड्रायव्हरला केलं आरोपी; धसांचा गौप्यस्फोट

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटातील ते दोन ‘वाँन्टेड’ आरोपी आहेत तरी कोण?, ज्यांना 'NIA'ने 'बेपत्ता' ठरवलंय!

Pro Kabaddi 12 Schedule: प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर! 'या' चार शहरांमध्ये रंगणार लढती

IND vs ENG 5th Test: 0.00305%: भारतीय संघाने असा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, जो आता तुटणे जवळपास अशक्यच...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरीच्या हर्ष व्यास याची एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण कमाई

SCROLL FOR NEXT