राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर अनेक त्रुटी समोर येतातय. त्यातच आता पडताळणीनंतर तब्बल 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अपात्र अर्जदाराच्या स्वयंघोषणापत्राचा आधार घेऊन त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...