पुणे

इंदापूर शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी

CD

इंदापूर, ता.२४ : इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप युती सरकारकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ महाराष्ट्र नगरोत्थान अभियान या योजनेतून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती माजीमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर तहसील कार्यालय ते इजगुडे पेट्रोल पंप रस्ता करणे (१६३.५४ लाख), दत्तनगर अंतर्गत ते कदम सभागृह ते बोरा हाईटस ते वडरगल्ली शौचालयापर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज करणे (११२.१३ लाख), महात्मा फुले शॉपिंग सेंटर नॅशनल हायवे ते मंगेश पाटील हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटी रस्ता करणे (१९९.९५ लाख), इंदापूर नगर परिषदेमध्ये योग भवन व लॅंडस्कॅपिंगचे बांधकाम (भाग अ) करणे (१५२.८८ लाख ), इंदापूर नगर परिषदेमध्ये योग भवन व लॅंडस्कॅपिंगचे बांधकाम (भाग ब) करणे (८०.३६ लाख), नगरोत्थान अभियान योजनेतून इंदापूर शहरात विविध ठिकाणी हायमास्ट उभारणे (२०.९१ लाख), नॅशनल हायवे बुलेट शोरूम ते डॉ. रूपनवर यांचे हॉस्पिटलपर्यंत रस्ता व अंडरग्राउंड करणे (३४.५५ लाख), मंडईमध्ये अंतर्गत रस्ते करणे (६८.७३ लाख ), रत्नप्रभात हाउसिंग सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईन व रस्ते करणे (४५.३६ लाख ), प्रभाग क्रमांक एक मध्ये भैरोबा नगर येथे अंतर्गत रस्ते व ड्रेनेज करणे ( १२८.२१ लाख ) या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला.
सदर निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आभार मानात आगामी काळातील शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

26882

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT