पुणे

बिजवडी आरोग्य केंद्राचा पुरस्काराने सन्मान

CD

इंदापूर, ता.३० : बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास (ता. इंदापूर) तालुक्यातील द्वितीय उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हा परिषद येथे आयोजित वार्षिक गुण गौरव पुरस्कार समारंभामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद पुणे येथे तालुक्यातील द्वितीय उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा व कर्मचारीवर्ग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे, डॉ विजयकुमार वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ आदी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, डॉ.भगवान पवार, आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, डॉ. प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शन तसेच सहकारी डॉ. समता सरवदे, डॉ. हनुमंत शिंदे, विस्तार अधिकारी दिलीप जगताप यांच्यासह सर्व कर्मचारी व स्थानिक लोप्रतिनिधींचे सहकार्य यामुळे हा पुरस्कार मिळाला असल्याचे डॉ.सुश्रुत शहा यांनी सांगितले.
बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना २०१३ मध्ये झाली. या केंद्राअंतर्गत एकूण लोकसंख्या ३२ हजार ४८६ इतकी आहे. एकूण ५१ कर्मचाऱ्यांसह कामकाज केले जाते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे उत्तम आरोग्य नियोजन करण्यात येते. जागरूक पालक सुदृढ बालक योजनेअंतर्गत १ ते १८ वर्षाचे ९ हजार ८०० मुलांची शाळा / अंगणवाडी मध्ये जाऊन प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. केंद्रात ३२ सुलभ प्रसूती झाल्या तर १७३ महिलांची मोफत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. २०० महिलांना पंतप्रधान मातृत्व वंदन योजना आणि जननी सुरक्षा योजनेमध्ये ५ हजार आणि ७०० रुपयांचा लाभ देण्यात आला.

03652

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT