सासवड, ता. ३ : पुरंदर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी (प्रांत) वर्षा लांडगे यांची तडकाफडकी बदली झाली होती. २ जुलै २०२५ च्या शासनाच्या आदेशानुसार ही बदली तत्काळ केली होती, मात्र लांडगे यांनी तातडीने मॅटच्या न्यायालयातून या बदलीला स्थगिती मिळवली आहे.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे भूसंपादन हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे काम वर्षा लांडगे यांच्या अखत्यारीत आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम सुरू असतानाच त्यांची बदली झाल्याने अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. प्रशासकीय धोरणांतर्गत ही बदली झाल्याचे आदेशात नमूद केले होते.
लांडगे यांच्या जागी प्रवीण शेळके यांची नियुक्ती केली होती. शेळके हे यापूर्वी सातारा जिल्ह्यात भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा पूर्वीचा भूसंपादनाचा अनुभव पाहता, त्यांना विमानतळ प्रकल्पाच्या कामात गती आणण्यासाठीच इथे आणले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
मात्र, लांडगे यांनी मॅटमधून बदलीला स्थगिती मिळाल्याने आता प्रशासकीय पातळीवर पुढील घडामोडी काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.