पुणे

गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजेन

CD

पुणे, ता. ६ : पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच असल्याने बाधितांची संख्या रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. शहरातील पथारी व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेते, हॉटेलचालक व कर्मचारी आणि व्यावसायिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांचीही चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी गुरुवारी (ता. ६) दिली.
कोरोना रुग्णांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर विक्रमकुमार यांनी स्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाचे निर्णय
- नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजेन चाचणी करणार
- विविध प्रकारचे विक्रेते, पथारीवाले, टपरीचालक, हॉटेल व्यावसायिक आदींची रॅपिड अँटिजेन चाचणी करणार
- क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कर्मचाऱ्यांची पथके तयार

नियमांचे पालन करण्याचा आदेश
मास्कविना फिरणारे नागरिक, थुंकणारे नागरिक तसेच अन्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तसेच महापालिका भवनमध्येही कोरोना कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार आहे, असे विक्रमकुमार म्हणाले.

प्रतिबंधित क्षेत्र जाहीर होणार
कोरोनासंदर्भात यापूर्वी लागू केलेल्या नियमावलीनुसारच प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली जाणार आहेत. ज्या इमारतीत पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतील ती इमारत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे, असेही विक्रमकुमार यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेतही रॅपिड अँटिजेन चाचण्या केल्या जात असून त्यात एक कर्मचारी बाधित आढळला आहे. पालिकेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची चाचणी केली जाणार आहे.

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. सध्या एकूण बांधित रुग्णांपैकी केवळ दोन टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यातही ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या आणखी कमी आहे. तर उर्वरित रुग्ण घरीच विलगीकरणात आहे. अद्याप लसीकरण पूर्ण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण वेगाने पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.
- विक्रमकुमार, आयुक्त, पुणे महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : मतमोजणीला सुरुवात; शिरुरमधून अमोल कोल्हे सहा हजार मतांनी आघाडीवर

India Lok Sabha Election Results Live : वाराणसीतून PM मोदीची आघाडी.... तर राहुल गांधीचे काय झालं? सुरुवातीच्या कलमध्ये बघा कोण जिंकतंय?

Lok Sabha Result: लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं आपलं खातं, सुरतमध्ये उधळला विजयाचा गुलाल

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result : सुरुवातीचे कल हाती; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? पहिले कल का असतात महत्त्वाचे?

Lok Sabha poll results: सुरुवातीचा पोस्टल मतांचा कल निकालाचे संपूर्ण चित्र का दाखवत नाहीत? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT