Lok Sabha poll results: सुरुवातीचा पोस्टल मतांचा कल निकालाचे संपूर्ण चित्र का दाखवत नाहीत? जाणून घ्या

Trends from postal ballots: केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी सांगितलं होतं की, सुरुवातीला पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी होईल.
postal ballots
postal ballots
Updated on

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. मतमोजणी सुरु करण्याआधी पोस्टाद्वारे आलेले मतं मोजले जातात. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी सांगितलं होतं की, सुरुवातीला पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी होईल. त्यानंतर ३० मिनिटांची ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल.

२०१९ च्या लोकसभा आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीचा वापर करण्यात आला होता. ईव्हीएममधील मतांची मोजणी झाल्यानंतर, पाच व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी होईल. त्यानंतर संपूर्ण निकाल जाहीर केला जाईल. मतमोजणी ८ वाजता सुरू झाली होती. दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत संपूर्ण कल स्पष्ट होतील.

postal ballots
Lok Sabha elections results 2024: चारशे पारचं स्वप्न अधुरं... पण मोदीच पुन्हा पंतप्रधान? जाणून घ्या विजेत्या खासदारांची संपूर्ण लिस्ट

पोस्टाद्वारे पाठवण्यात आलेल्या मतांना पोस्टल बॅलेट म्हटलं जातं. जे मतदार मतदानकेंद्रावर जाऊन मतदान करु शकत नाहीत किंवा ज्यांना पोस्टाद्वारे मतदान करण्यास परवानगी मिळाली आहे ते मतदान पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करतात. सशस्त्र लष्करी दल, राज्य पोलीस कर्मचारी, मतदान केंद्रावर तैनात कर्मचारी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, ८० वर्षे वयापुढील वृद्ध, दिव्यांग व्यक्ती हे पोस्टाद्वारे मतदार करतात.

पोस्टल मते ते मतमोजणी केंद्रावर कठोर सुरक्षेखाली मोजले जातात. मतमोजणीच्या दिवशी मतपेढीतून काढून ते वेगळे मोजले जातात. अशा मतांची मोजणी होताना त्याठिकाणी रिटर्निंग अधिकारी असतो. पोस्टल मते उघडून त्यांची वैधता तपासली जाते. वैध असलेली मतेच मोजली जातात. त्यानंतर ते एकूण मतांमध्ये जोडले जातात. याबाबत शेवटपर्यंत गुप्तता ठेवली जाते.

postal ballots
India Lok Sabha Election Results : 300च्या आधी थांबली NDAची गाडी, PM मोदींनी जनतेचे मानले आभार, काँग्रेस म्हणाली- मोदींच्या विरोधात जनादेश

विविध एक्झिट पोलमध्ये देशात राष्ट्रील लोकशाही आघाडी सरकार स्थापन करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एनडीएला जवळपास ३५० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर, इंडिया आघाडीला यावेळीही निराश व्हावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com