पुणे

आरटीई प्रवेशासाठी १६ फेब्रुवारीपासून आॅनलाइन अर्ज

CD

पुणे, ता. ३१ ः बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी येत्या १६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. आगामी शैक्षणिक वर्षासाठीचे (२०२२-२३) हे आॅनलाइन अर्ज असणार आहेत. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारपासून (ता. १) हे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, ती उद्यापासून सुरु केली जाणार नसल्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी सोमवारी सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षण विभागाला पत्राद्वारे कळविले आहे.
या कायद्यातील तरतुदीनुसार पुणे शहर व जिल्ह्यातील खासगी विना अनुदानित शाळांमधील २५ टक्के जागा या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यासाठी राखीव ठेवले जातात. या मोफत प्रवेशासाठी पात्र असलेल्या इच्छुकांकडून आवश्‍यक कागदपत्रांसह दरवर्षी जानेवारी महिन्यापासून आॅनलाइन प्रवेश अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे ही प्रकिया थोडी उशिरा सुरू होत असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून सोमवारी सांगण्यात आले.
आगामी शैक्षणिक वर्षातील या राखीव जागांवरील प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक २३ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२२ पासून यासाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरवात केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, दिनकर टेमकर यांनी ३१ जानेवारीला एका पत्राद्वारे ही प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरु होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT