पुणे

‘नेल आर्ट’ ठरू शकते घातक!

CD

पुणे, ता. २ : नखांना रंगवण्याची, सजवण्याची भन्नाट क्रेझ हल्ली तरुणी व महिला वर्गामध्ये वाढलेली दिसून येत आहे. त्यासाठी अगदी हजारो रुपये देखील खर्च केले जात आहेत. त्यामुळे नेल आर्ट करणाऱ्यांना अच्छे दिन आले असून हा ट्रेंड दिवसागणिक वाढतच आहे. मात्र, आपले वेगळेपण निर्माण होण्यासाठी केलेले हे प्रयत्न मात्र शरिरासाठी घातक देखील ठरू शकता. कारण सातत्याने नखांवर केले जाणारे हे ‘आर्ट’ वाईट परिणाम ही करतात.


त्वचारोगतज्ज्ञ अभिजित कराडे म्हणतात
१) वारंवार आणि योग्य पद्धतीने नेल आर्टमुळे न केल्याने नखांच्या क्यूटिकलला ही नुकसान होऊ शकते.
२) परिणामी संसर्ग आणि जळजळ याची शक्यता जास्त असते.
३) जेल किंवा अॅक्रेलिक नेल पॉलिशमुळे नखांची गुणवत्ता खराब होते.
४) नेल आर्टदरम्यान वापरले जाणारे यूव्ही लाइट हाताच्या त्वचेवर पडल्याने, त्वचेच्या कर्करोगाची समस्या उद्‍भवू शकते.
५) त्यामुळे यूव्ही लाइट ऐवजी एलइडी क्युरिंग लाइट्स वापरणाऱ्या नेल आर्टला प्राधान्य द्यावे.

५० रुपयांपासून १० हजारपर्यंत खर्च
घरगुती कार्यक्रम असो व कोणता मोठा सोहळा. या सोहळ्यात आपला लूट हटके असावा, असा अनेक महिन्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी नव-नवीन ट्रेंड फॉलो केले जातात. त्यात आता नेल आर्टला पसंती दिली जात आहे. त्यामुळेच सध्या शहरातील विविध भागांमध्ये ब्युटी पार्लरप्रमाणे आता नेल आर्ट स्टोअर देखील दिसून येत आहेत. विविध रंग आणि त्यावर साजेल असे डिझाइन करण्यासाठी महिला वर्ग हजारो रुपये खर्च करत आहेत. या आर्टसाठी येणार खर्च अगदी ५० रुपयांपासून १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक देखील आहे, अशी माहिती नेल आर्टीस्टने दिली.

उपकरणे
- ॲक्रेलिकचा वापर करत कृत्रिम नखे तयार करणे किंवा नेल एक्स्टेंशन करणे
- युव्ही लाइट
- नेल डॉटर्स (डॉटिंग टूल्स)
- नेल आर्ट ब्रशेस
- स्टेशनरी टेप किंवा स्टिकर्स
- स्पंज (ग्रेडियंट इफेक्टसाठी)
- नेल जेल आदी

प्रकार
- ग्लीटर
- नेल आर्ट पेन
- स्टॅम्पींग
- वॉटर मार्बलिंग
- विविध गोष्टी नखांवर लावणे (चेन, अत्यंत लहान बाटली, वाळलेली फुले, कागद आदी)

घातक परिणाम
- नखांमधील प्रोटीनवर परिणाम
- यामुळे नखे पातळ होण्‍याची समस्या
- नखांचा नैसर्गिक रंग खराब होणे
- कोरडे पडणे
- ठिसूळपणा
- नखे तुटण्याची समस्या
- बुरशीजन्य संसर्गाची शक्यता आदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT