पुणे

बोगस शालार्थ प्रकरणांच्या चौकशीसाठी एसआयटी

CD

पुणे/मुंबई, ता. ७ : नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीतील आयडी मान्यता संदर्भातील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आज शालेय शिक्षण विभागाने पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथकात (एसआयटी) तीन सदस्यांची स्थापन केली आहे. यात कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा, शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण सहसंचालक हारून आतार याचा समावेश आहे.
ही एसआयटी २०१२ पासून ते आजतागायतच्या सर्व प्रकरणांची चौकशी आणि तपास करणार असल्याचे यात प्रचंड मोठ्या प्रमाणात‍ अधिकाऱ्यांसह शाळा, संस्थाचालक, शिक्षक अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही समिती राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत अनुदानित आणि अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवा सातत्य, विनाअनुदानितवरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर करणार आहे. यात २०१२ पासूनच्या प्रकरणांचा तपास घेणार असल्याने शिक्षक भरतीला बंदी असताना मुंबईसह राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या झालेल्या भरतीचीही चौकशी होणार आहे. यापूर्वी भरतीच्या चौकशीसाठी तयार केलेले अहवाल आणि त्याच्या फायलीही नव्याने उघडल्या जाणार असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 150 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

Pune Municipal Corporation : कोंढव्यातील आठमजली अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची धडक कारवाई

Baramati News : रेशीमकोषांची कोटीची उलाढाल; बारामती बाजार समितीत २२२ शेतकऱ्यांकडून २३ टनांची विक्री

Shalarth ID Scam: पुणे विभागीय आयुक्त करणार शालार्थ आयडीचा तपास; नव्या एसआयटीत पोलिस महानिरीक्षक, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक

Latest Marathi News Updates : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जाबाबत याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT