Shalarth ID Scam: पुणे विभागीय आयुक्त करणार शालार्थ आयडीचा तपास; नव्या एसआयटीत पोलिस महानिरीक्षक, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक
SIT Investigation: बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी नव्या एसआयटीची स्थापना झाली असून पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली तपास होणार आहे. या प्रकरणात अनेक जिल्ह्यांचा समावेश असून राज्यस्तरावर कारवाई सुरू झाली आहे.
नागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी गठीत एसआयटीत ‘आयएएस’ अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार, आता पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तपास करण्यात येणार आहे.