पुणे

अवतीभवती

CD

अष्टविनायक भूषण पुरस्कार
पुणे ः येरवड्यातील प्रतीकनगरमधील अष्टविनायक मित्र मंडळातर्फे गणेश जयंतीनिमित्त माजी नगरसेवक ॲड. भगवान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या हस्ते १७ जणांना ‘अष्टविनायक भूषण पुरस्काराने’ गौरविण्यात आले.
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते सायकलपटू आयुष कदम व प्रतिकनगर सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे संस्थापक राहुल जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
-----
कार्यालयावरील हल्‍ल्याचा निषेध
पुणे ः मुंबईत परळमध्ये १०२ वर्षांची परंपरा असलेल्या कुणबी समाजोन्नती संघाच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीचा अखिल महाराष्ट्र कुणबी समाज सेवा संघातर्फे निषेध करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरील पोस्टचे निमित्त करून १८ जानेवारी रोजी रात्री ९. ३० च्या सुमारास कुणबी समाजोन्नती संघाच्या कार्यालयात काहीजणांनी मोडतोड केली. कार्यालयात उपस्थित असलेल्यांवर यावेळी प्राणघातक हल्लाही झाला. तरी या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सेवा संघाचे अध्यक्ष महादेव मेंगे यांनी केली आहे.
-------
सूर्यनमस्कार प्रशिक्षण
पुणे ः सेवा आरोग्य फाउंडेशन व समग्र हेल्थ केअर सेंटरतर्फे कोथरूड, वारजे, कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर, एरंडवणे भागातील सेवा वस्तीतील पाचशे मुलींतर्फे मकरसंक्रांत ते रथसप्तमी या दरम्यान सूर्यनमस्कार यज्ञ कार्यक्रम घेण्यात आला. १ ते ८ जानेवारी दरम्यान कार्यकर्त्यांनी वस्तीत जाऊन सुरवातीला त्यांना सुर्यनमस्काराचे प्रशिक्षण दिले. १५ ते २८ जानेवारी दरम्यान सर्वांनी घरी सूर्यनमस्कार घालण्याचा सराव केला.
रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर हा सूर्यनमस्कार यज्ञ घेण्यात आला. या सांगता समारोह कार्यक्रमप्रसंगी सेवा आरोग्य फाउंडेशनचे संचालक प्रदीप कुंटे, सेन्साटा टेक्नॉलॉजीजच्या अपर्णा दिवेकर, सविता कजरेकर, श्रीया समर्थ हेल्थ टेक्नॉलॉजीच्या योजनगंधा मराठे, डॉ. आनंद गोडसे, अमित कुलकर्णी, डॉ. हर्षदा पाध्ये आदी उपस्थित होते.
------
‘मनसे’चा तिळगूळ समारंभ
पुणे ः महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना पुणे शहरातर्फे तिळगुळ मेळावा कार्यक्रम नुकताच झाला. त्यात महिलांचे खेळ, उखाणे स्पर्धा, महिलांना गृह उद्योगाच्या व्यवसायाच्या अनेक संधी, महिला सक्षमीकरण अशा विषयांवर अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी ॲड. अर्चना मोरे, नेटसर्फ कंपनीच्या लक्ष्मी पाटील यांनी महिलांना गृहउद्योग आणि महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व महिलांना आधुनिक विचारांचे वाण देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर अध्यक्षा वनिता वागसकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा सपकाळ यांनी केले.
----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT