पुणे

ज्येष्ठांना घरातूनच करता येणार मतदान

CD

पुणे, ता. ५ : कसबा पेठ व चिंचवड विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीमध्ये ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना मतदान करणे सोपे होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून यंदा प्रथमच या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सर्व संबंधित समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी पोलिस उपायुक्त आर. राजा, संदीपसिंग गिल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख यांनी सांगितले, की ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी अशा पात्र मतदारांकडून नमुना १२ डी हा अर्ज मतदारांकडून वेळेत भरून घ्यावा. त्यादृष्टीने आवश्‍यक नियोजन करण्यात यावे.

मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठीच्या सुविधांची माहिती द्यावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृतीचे कार्य करावे. सी-व्हीजिल ॲपवरील तक्रारींचे कालमर्यादेत निवारण होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करावे. निवडणुकीशी संबंधित सर्व अहवाल वेळेवर द्यावेत आणि कालमर्यादेत कामे करावीत. नागरिकांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT