पुणे

गुन्हे वृत्त सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

CD

पुणे : दत्तवाडी पोलिसांनी जनता वसाहतीमधील एका सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. दांडेकर पुलाजवळ मांगीरबाबा चौकाजवळ ही कारवाई केली. गणेश नंदकुमार महामुनी (वय २८, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दत्तवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी हे गस्तीवर असताना सराईत गुन्हेगार गणेश महामुनी हा मांगीरबाबा चौकात आल्याची माहिती मिळाली. त्यावरून दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून महामुनी याला अटक केली. त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

शिवनेरी बसमधून लॅपटॉपसह मोबाईल चोरी
पुणे : शिवनेरी बसमधून चोरट्याने एका प्रवाशाचा लॅपटॉप आणि मोबाईल लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. २०) दुपारी घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विक्रम पवार (वय ३२, रा. कांदिवली पूर्व) यांनी फिर्याद दिली आहे. पवार हे स्वारगेट बसस्थानकातून बोरिवलीला शिवनेरी बसमधून प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान चोरट्याने पवार यांच्या बॅगमधून लॅपटॉप, चांदीची अंगठी आणि मोबाईल असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

घरकाम करणाऱ्या महिलांविरुद्ध गुन्हा
पुणे : नजर चुकवून घरातून दागिने चोरी केल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरातून साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना औंध-बाणेर लिंक रोड परिसरात घडली. याबाबत एका महिलेने (वय ४७, रा. दि. स्पायर्स, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ मध्ये घडला. घरकाम करणाऱ्या महिलेने नजर चुकवून बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने चोरी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. हडपसर परिसरातही एका महिलेने घरातून एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २० फेब्रुवारी रोजी घडला. याबाबत एका महिलेने (वय ३०, रा. मांजराइ व्हिलेज, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
पुणे : पीएमपी बसमध्ये चढत असताना चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले. हडपसर येथील पीएमपी बसडेपोमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला. याबाबत ज्येष्ठ महिलेने (वय ७५, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही महिला मांजरी येथे जाण्यासाठी पीएमपी बसमध्ये चढत होती. त्यावेळी या महिलेचे सुमारे २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पसार झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT