पुणे

नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध

CD

पुणे, ता. १४ ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर पुणे विभागाच्या सात प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली आहे. पुणे विभागाच्या सात जागांसाठी २० उमेदवारांचे अर्ज आले होते, मात्र त्यातील १३ उमेदवारांनी माघार घेतली.
पुण्यातून भाऊसाहेब भोईर, मेघराज राजेभोसले, सुहास जोशी, सुरेश धोत्रे, दीपक रेगे, सत्यजित धांडेकर आणि समीर हंपी यांची बिनविरोध निवड झाली. माधव अभ्यंकर, सुनील महाजन, दीपाली शेळके, बाबा पाटील, संतोष रासने, विजय पटवर्धन, भैरवनाथ शेरखाने, सुदाम परब आदींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. अर्ज मागे घेत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेल्या उमेदवारांचे भाऊसाहेब भोईर, दीपक रेगे, सत्यजित धांडेकर आणि समीर हंपी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आभार मानले.
परिषदेच्या नियामक मंडळाच्या ६० जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठीचे अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. आता १६ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी करून विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT