पुणे

पावसाचे सावट उद्यापासून दूर होण्याची शक्यता

CD

पुणे, ता. १८ ः सकाळी सूर्याचा प्रकाश अन् दुपार होताच ढगाळ वातावरणाची स्थिती... असे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी व रिमझिम होत आहे, परंतु आता पावसाचे सावट दूर होणार असून सोमवारपासून शहर आणि परिसरात निरभ्र वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

शहरात शनिवारी (ता. १८) दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता जाणवत होती. मात्र, जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. तर शहरात ढगाळ वातावरण कायम होते. यामुळे शहरातील कमाल तापमान हे ३१.४ अंश सेल्सिअस आणि किमान १५.८ अंश सेल्सिअस नोंदवली गेले. रविवारी (ता. १९) शहर व परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेची शक्यता आहे. तर सोमवारपासून (ता. २०) पावसाचे सावट दूर होत मुख्यतः निरभ्र हवामान राहू शकते.

राज्यात काही ठिकाणी गारपिटांसह वादळी पाऊस हजेरी लावत आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचेही नुकसान होत आहे. दरम्यान, रविवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. जळगाव येथे शनिवारी ३४.५ अंश सेल्सिअस या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे सध्या तापमानात चढ-उतार कायम आहे. सध्या हवेचा कमी दाबाचा पट्टा हा दक्षिण कर्नाटक ते झारखंडपर्यंत तयार झाला असून ईशान्य अरबी समुद्रापासून राजस्थानपर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. परिणामी, राज्यात पावसासाठी पुरक स्थिती कायम आहे. रविवारी (ता. १९) नाशिक, नगर, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे येथे पावसाची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT