पुणे

‘रॅप’ प्रकरणी कडक कारवाई करावी विविध संघटनांचा आक्रमक; आंदोलनाचा इशारा

CD

पुणे, ता. ३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केलेल्या ‘रॅप’चे चित्रीकरण केल्याप्रकरणी संबंधित परवानगी देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर, तसेच सुरक्षा यंत्रणेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. तसेच दोषींवर त्वरीत कारवाई न झाल्यास नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असाही इशाराही संघटनांनी दिला आहे.

विद्यापीठात ‘रॅप’च्या चित्रीकरणाचे प्रकरण समोर येऊनही प्रशासन चौकशी समितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे. या प्रकरणात दोषींवर त्वरीत कारवाई होणे अपेक्षित असताना नुसतेच दिवस ढकलले जात आहेत, त्यामुळे दोषींवर त्वरीत कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना दिले आहे. या शिष्टमंडळात विद्यार्थी विकास मंचचे ॲड. सुरेश खुर्पे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, प्रदेश काँग्रेस लिगल सेलचे ॲड. फैय्याज शेख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत वर्मा, शंकर जमादार, अनिल शेवरे, श्रीनिवास दिसले, वंचित आघाडीचे अतुल झोडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमरजित पबमे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अथवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. जेणेकरून सध्या सुरू असलेल्या चौकशीदरम्यान नेमलेल्या समितीस दबावमुक्त आणि पारपदर्शकपणे काम करता येईल. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी कामावर उपस्थित असलेल्या सुरक्षा यंत्रणेवर कारवाई करावी. चौकशी समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करून सत्य समोर आणावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- सुरेश खुर्पे, अध्यक्ष, विद्यार्थी विकास मंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT