पुणे

गुन्हे वृत्त

CD

अपघातात टॅंकरचालकासह दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे : वडकी येथील दिवेगड हॉटेलजवळ भरधाव टॅंकरने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीला धडक देत दोघांना गंभीर जखमी केले. या अपघातात टॅंकरचालक गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. दुचाकीस्वार धनंजय दगडू पवार (वय ४२, सुवर्णनगरी सोसायटी, सासवड) आणि टॅंकरचालक पांडुरंग ज्ञानदेव शिंदे (वय ६०, रा. सोमेश्वरनगर, बारामती) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हा अपघात सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास दिवेघाटातील पायथ्याच्या पहिल्या वळणावर झाला. या प्रकरणी फिर्यादीचा चुलतभाऊ सनी उत्तम पवार (रा. भिवडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात टॅंकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गेटमनच्या तत्परतेमुळे महिलेचे वाचले प्राण
पुणे : रेल्वे गेटमन आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे रेल्वेखाली आत्महत्या करण्यासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय महिलेचे प्राण वाचले. उरुळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ येथे मध्यरात्री ही घटना घडली. ही महिला आणि त्यांचे पती कोरेगाव मूळ भागात राहतात. त्यांचा एक मुलगा बंगळूर येथे अभियंता आणि दुसरा मुलगा लष्कराच्या कमांड रुग्णालयात नोकरीस आहे. ही महिला काही महिन्यांपासून आजारी आहे. पतीसोबत वाद झाल्यामुळे त्या मध्यरात्री लोहमार्गावर आल्या. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक महिला रुळावर बसल्याचे रेल्वेच्या गेटमनला दिसले. त्यांनी रेल्वे फाटकाजवळ राहणाऱ्या समीर घावटे आणि सुप्रिया घावटे यांना माहिती दिली. गेटमन आणि घावटे दांपत्याने लोहमार्गावर धाव घेत महिलेला बाजूला नेले. त्यांनी याबाबत पोलिस पाटील वर्षा कड, सचिन कड आणि लोणी काळभोरचे पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांना माहिती दिली. तसेच महिलेला धीर देऊन त्यांच्या घरी सोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT