पुणे

‘स्थायी’ची निविदेला मंजुरी : परिसरातील रहिवाशांची सोय येवलेवाडी रस्त्याचे काम होणार सुरू

CD

पुणे, ता. २० : कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झालेले असताना आता
याच भागातील टिळेकरनगर येवलेवाडी २४ मीटर रस्त्याच्या कामही सुरू होणार आहे. यासाठी स्थायी समिती १८ कोटी २९ लाख २० हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली आहे. टिळेकरनगर, कामठेनगर, पानसरेनगर आणि येवलेवाडीमधील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. हा रस्ता रखडल्याने या भागातील नागरिकांना त्रास होत असल्याचा विषय ‘सकाळ’ने वारंवार मांडला होता.

गेल्या वर्षी पावसाळ्यात काम सुरू केले पण अवघे २०० फूट लांबीचे काम झाले. त्यानंतर हे काम हाती घेण्यात आले नाही. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी २२ कोटींचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली. मे. साईप्रभा कन्स्ट्रक्शनची १८ कोटी २९ लाख २० हजार रुपयांची निविदा आली. ही निविदा पूर्वगणनपत्रकापेक्षा १६ टक्कापेक्षा कमी दराने आली आहे. या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या रस्त्याची एकूण लांबी २ किलोमीटर आहे. त्यापैकी १ हजार ४०० मीटरचा लांबीचा रस्ता २४ मीटर रुंद आहे. तर उर्वरित ६०० मीटर रस्ता १० मीटरचा आहे. या कामाला मंजुरी मिळाल्याने येत्या वर्षभरात हा रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध होईल.

पर्यायी रस्ता नागरिकांना सोयीचा
कात्रज-कोंढवा रस्त्यावर इस्कॉन मंदिर चौकाजवळून येवलेवाडीला जाणारा रस्ता अरुंद आहे. तो अपूर्ण विकसित झाला असल्याने नागरिकांना गैरसोयीचा आहे. खडी मशिन चौकाकडून पानसरेनगर, येवलेवाडीला अवघड जात असल्याने हा पर्यायी रस्ता येवलेवाडीच्या नागरिकांसाठी सोयीचा आहे. तसेच हा रस्ता खडी मशिन चौकाकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला समांतर असणार आहे. वाढती वाहतूक कोंडी यामुळे याचे काम लवकर व्हावे अशी मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT