NAAC
NAAC esakal
पुणे

NAAC : नॅक मूल्यांकनात महाराष्ट्र आघाडीवर; राज्यातील एक हजार ९५७ संस्थांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील प्रत्येक उच्चशिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, म्हणून उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. अधिकाधिक विद्यापीठांसह महाविद्यालयांमार्फत मूल्यांकन करण्यात येत आहे.

त्यामुळे नॅक मूल्यांकनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) आकडेवारीनुसार राज्यातील ३५ विद्यापीठे आणि एक हजार ९२२ महाविद्यालये, अशा एकूण एक हजार ९५७ उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहे.

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांना नॅक मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे. नॅक मूल्यांकनाच्या श्रेणीवरून एखाद्या शिक्षण संस्थेचा दर्जा लक्षात येतो.

मात्र, मूल्यांकनाची प्रक्रिया क्लिष्ट आणि अधिक वेळ खाऊ असल्याने राज्यातील अनेक महाविद्यालयांकडून नॅक मूल्यांकनाकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु, राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्च शिक्षण विभागाने वारंवार पत्रे पाठवून पाठपुरावा केला आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित आहेत. ‘नॅक’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या मे २०२३ च्या आकडेवारीनुसार नॅक मूल्यांकन केलेल्या सर्वाधिक एक हजार ९५७ उच्च शिक्षण संस्था महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटकमधील एक हजार २८ शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन केले आहे. तर तमिळनाडूतील ९०४ संस्थांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

‘‘गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी शासन स्तरावरून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यामध्ये नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रोखणे, महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचे आदेश देणे, अशी पावले उच्च शिक्षण विभागातर्फे उचलण्यात आली. परिणामी राज्यातील अधिकाधिक शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आणि म्हणूनच या मूल्यांकनात महाराष्ट्र देशात आघाडीवर जाऊ शकला.’’
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण संचालक

‘नॅक’ मूल्यांकन केलेल्या शिक्षण संस्थांची आकडेवारी
राज्ये : विद्यापीठे : महाविद्यालये : एकूण
महाराष्ट्र : ३५ : १,९२२ : १,९५७
गुजरात : २७ : ५०० : ५२७
कर्नाटक : ३४ : ९९४ : १,०२८
तमिळनाडू : ४५ : ८५९ : ९०४
उत्तर प्रदेश : ३९ : ६१७ : ६५६
पश्चिम बंगाल : १७ : ४११ : ४२८

देशातील उच्च शिक्षण संस्थांची आकडेवारी(मूल्यांकन केलेले)
- विद्यापीठे : ४३०
- महाविद्यालये : ९,२५७
- एकूण : ९,६८७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hunter Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या मुलाला होणार 25 वर्षांचा तुरुंगवास? बेकायदा बंदूकप्रकरणात ठरला दोषी

Prataprao Jadhav: धन्वंतरीची विधीवत पुजा करून प्रतापराव जाधवांनी स्विकारला आयुष मंत्रालयांचा पदभार!

Modi Ka Pariwar: प्रचार संपला! आता 'मोदी का परिवार' हटवा; प्रधानमंत्र्यांचं फॉलोवर्सना आवाहन

IND vs USA: भारतासमोर पाकिस्तानला नमवणाऱ्या अमेरिकेचं आव्हान! कधी अन् कसा पाहाणार सामना, अंपायर कोण? जाणून घ्या डिटेल्स

मोठी बातमी! आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांसाठी थेट गावातून पंढरपूरपर्यंत बस, पण ‘ही’ आहे अट; महामंडळाकडून यंदा ५००० बसगाड्यांची सोय

SCROLL FOR NEXT