Modi Ka Pariwar: प्रचार संपला! आता 'मोदी का परिवार' हटवा; प्रधानमंत्र्यांचं फॉलोवर्सना आवाहन

लोकसभा निवडणूक जनतेनं आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत.
Modi Ka Pariwar
Modi Ka Pariwar

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा प्रधानमंत्रीपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी जनतेनं आपल्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वापरलेली 'मोदी का परिवार' ही घोषणा देखील आता ट्विटरच्या प्रोफाईलवरुन हटवण्याची विनंती केली आहे. (Drop Modi ka Parivar from social media handles PM request to followers)

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी आपल्या समर्थकांना हे आवाहन केलं आहे. मोदींनी म्हटलं की, निवडणूक प्रचारावेळी देशभरातील लोकांनी आपल्या ट्विटरवर 'मोदी का परिवार' अशी घोषणा लावत माझ्याप्रती आपुलकी व्यक्त केली होती. यातून मला खूपच बळ मिळालं. त्यामुळं भारताच्या लोकांनी एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवून दिलं. हा एक प्रकारचा विक्रमच आहे. तसंच आम्हाला पुन्हा आपल्या देशासाठी काम करण्याची संधी दिली.

Modi Ka Pariwar
DA Hike Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 16 टक्के वाढीची घोषणा

आपण सर्वजण जण एका कुटुंबाचा भाग आहोत हा संदेश या मोहिमेतून प्रभावीपणे सांगितला गेला. त्यामुळं मी पुन्हा एकदा भारताच्या जनतेचे आभार मानतो आणि विनंती करतो की आता तुम्ही मोदी का परिवार तुमच्या सोशल मीडिया हँडलवरुन हटवा. यामुळं तुमचा प्रोफाईलवरील नाव बदलेल पण आपले संबंध भारताला मजबुतीनं पुढे घेऊन जाईल.

Modi Ka Pariwar
Manoj Jarange: "गोड बोलून काटा काढायाचा प्रयत्न"; उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

दरम्यान, या वर्षी मार्च महिन्यात तेलंगाणातील अदिलाबाद इथल्या एका सार्वजिनिक सभेत प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण देशच 'मोदी का परिवार' आहे, ही घोषणा दिली होती. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी एका सभेत बोलताना मोदींवर टीका केली होती. त्यात 'प्रधानमंत्री मोदींना स्वतःचं कुटुंब नाही' असा उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून मोदींनी ही घोषणा दिली होती.

मोदींनी ही घोषणा दिल्यानंतर लगेचच त्याचा राजकीय फायदा घेण्याच्या हेतूनं भाजपच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलच्या नावापुढं 'मोदी का परिवार' असं लिहिलं होतं. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील आपल्या ट्विटरवर 'मोदी का परिवार' असं लिहिलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com