पुणे

प्रमख रस्ते, चौकात अतिक्रमण कारवाईची मोहीम

CD

पुणे, ता. २६ ः शहरातील रस्त्यावर अनधिकृत पथारींचा ताबा, अधिकृत पथारी व्यावसायिकांचे रखडलेले पुनर्वसन रखडलेले असताना आता सोमवारपासून (ता. २९) प्रमुख ४५ रस्ते आणि १५३ चौक अतिक्रमण मुक्त केले जाणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.

महापालिकेने अनेक वर्षापूर्वी शहरातील गोपाळकृष्ण गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, सातारा रस्ता, नेहरू रस्ता, सोलापूर रस्ता, सेनापती बापट रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता यासह ४५ रस्ते व १५३ चौक नो हॉकर्स झोन म्हणून जाहीर केलेले आहेत. पण हा झोन केवळ कागदावर असून, अनधिकृत पथारींची संख्या या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. त्यामुळे रस्ते, पदपथांवरून नागरिकांना पदपथावरून चालणे अवघड झाले आहे. शिवाय वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे या अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे, अधिकृत पथारी व्यावसायिकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जागांचा शोध सुरू आहे. लवकरच त्याबाबत परिपत्रक काढले जाणार आहे, असे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

वादानंतर कारवाईचे नियोजन
अनधिकृत स्टॉलधारकांवर कारवाई करताना जगताप यांनी लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून वाद निर्माण झाला, त्यातून जगताप यांचे अधिकार कमी केले आहेत. पण आता अतिक्रमण विभागाकडून रस्ते, पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोहिमेचे नियोजन केले आहे. ४५ रस्ते आणि १५३ चौक अतिक्रमण मुक्त केले जाणार आहे. अधिकृत पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करताना शहर फेरीवाला समितीची मान्यता घेतली जाईल. या समितीत स्वयंसेवी संस्थांचे सहा सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्तावही आयुक्तांकडे सादर झाला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर काही पुढील कार्यवाही केली जाईल, असे जगताप यांनी सांगितले.

हल्ले रोखण्यासाठी बैठक
महापालिकेच्या अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होते आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर जामिनावर सुटलेले आरोपी कर्मचाऱ्यांना पुन्हा धमकावत आहेत, अशा तक्रारीही आल्या आहेत. याबाबत याविषयी पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले असून, यासंदर्भात लवकरच बैठक होणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT