Pune Crime News : ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा
Pune Crime News : ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा Sakal
पुणे

Pune Crime News : ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime : नवीन वीज मीटर जोडणीसाठी महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्याने बांधकाम व्यावसायिकाकडून २४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने बुधवारी (ता. १४) गुन्हा दाखल केला आहे.

योगेश गोकूळ पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाटील महावितरणच्या सेनापती बापट रस्त्यावरील कार्यालयात तंत्रज्ञ आहे. प्राप्त माहितीनुसार, एका बांधकाम व्यावसायिकाने पुनर्विकास केलेल्या इमारतीमध्ये नवीन चार वीज मीटर जोडणीसाठी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता.

पाटीलने पाहणी अहवालात त्रुटी न ठेवण्यासाठी आणि वीज मीटर जोडणीसाठी प्रत्येकी सहा हजार रुपये अशी २४ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी खातरजमा केली. त्यात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT