SPPU Admission
SPPU Admission sakal
पुणे

SPPU Admission : विद्यापीठ प्रवेशासाठी १० मे अंतिम मुदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक सामाईक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून १० मेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

विद्यापीठाच्या विभागांमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात. यासाठी दरवर्षी १०० गुणांची ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुण्यातील विद्यापीठाच्या मुख्य संकुलासह नाशिक येथील उपकेंद्रातील अभ्यासक्रमांचाही या प्रवेश परीक्षेत सहभाग आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्होकेशनल, तांत्रिक, व्यवस्थापन, ललित कला, उपयोजित विज्ञानातील अनेक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. पूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाणारे विद्यापीठ आता पदवी अभ्यासक्रमांबरोबरच सर्वसमावेशक पदवीचे केंद्र बनत आहे. त्यामुळे इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविता येणार आहे.

प्रवेश परीक्षेचे स्वरूप

  • २० गुणांची सामान्य ज्ञान व अभियोग्यतेची प्रश्‍नपत्रिका, तर ८० गुणांची मुख्य विषयाची प्रश्‍नपत्रिका असेल

  • चुकीच्या प्रश्नाला एकचतुर्थांश गुण वजा होणार

  • दोन तासांची ऑनलाइन प्रवेश परीक्षा

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम मुदत : १० मे

पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा : १३ जून

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा : १४ ते १६ जून

अधिक माहितीसाठी : https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT