पुणे

घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईताला अटक

CD

पुणे, ता. २५ : घरफोडीचे १५० हून जास्त गुन्हे दाखल असलेला चोरटा जयवंत ऊर्फ जयड्या याला अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघड झाले असून, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जयवंत ऊर्फ जयड्या गो‌‌‌वर्धन गायकवाड (वय ३८, रा. डॉ. आंबेडकर वसाहत, औंध) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहरातील मध्यभागातील घरांमध्ये झालेल्या चोरीचा विश्रामबाग पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. त्या तपासात गायकवाडने घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, सहाय्यक फौजदार राकेश गुजर, रेवण कंचे, अशोक माने, मयूर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, अर्जुन थोरात यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT