पुणे

शास्त्रीनगर चौकातील उड्डाणपुलाला मिळेना ‘ग्रीन सिग्नल’

CD

पुणे, ता. २७ ः येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामध्ये उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्यासाठी महापालिकेकडून दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे (एनएमए) सादरीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप या कामाबाबत ‘ग्रीन सिग्नल’ मिळालेला नाही.
येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने विकास आराखड्याअंतर्गत चौकामध्ये उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्याच्या ठिकाणापासून काही अंतरावरच आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू येते. संबंधित वास्तू भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. त्यामुळे या वास्तूच्या परिसरात कोणत्याही प्रकारची कामे करण्यास अडचण येते. मात्र, नगर रस्त्यावरून गोल्फ क्‍लबकडे येताना आणि तेथून नगर रस्ता, कल्याणीनगरकडे जाताना या चौकामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून ५ एप्रिल रोजी दिल्लीत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणासमोर उड्डाणपूल व भुयारी मार्गासंबंधीचे दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले. मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप पाटील यांनी ‘एनएमए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले. उड्डाणपुलामुळे आगाखान परिसरातील कस्तुरबा स्मारकाला अडथळा येऊ शकतो, असा प्रश्‍न ‘एनएमए’च्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. मात्र, उड्डाणपुलामुळे कस्तुरबा स्मारक पुलावरून ये-जा करणाऱ्यांना व्यवस्थित दिसू शकेल, त्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही, असे अधिकाऱ्यांना बैठकीत सांगण्यात आले. मात्र अजून त्यांच्याकडून कामाला मान्यता मिळालेली नाही.

पुरातत्त्व विभागाचीही परवानगी आवश्‍यक
राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणासमोर उड्डाणपूल व भुयारी मार्गाबाबत सादरीकरण झाले. त्यास प्राधिकरणाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरही, राज्य पुरातत्त्व विभागाची मान्यता मिळाल्यावरच महापालिकेला काम करता येईल.


‘‘आगाखान पॅलेस ही वास्तू पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत येते. त्यामुळे या वास्तूच्या परिसरात भुयारी मार्ग, उड्डाणपूल यांचे काम करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणासमोर महापालिकेने सादरीकरण केले आहे.’’
-अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT