पुणे

तुतारी

CD

‘पिपाणी’ला मराठीतही ‘ट्रम्पेट’च उच्चारले जावे
मुख्य निवडणूक आयोगाचा निर्णय
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ३१ : ‘तुतारी वाजवणाऱ्या माणसाला’ ‘पिपाणी’ अडचणीची ठरू लागल्याने यापुढे निवडणूक तक्त्यामध्ये ‘पिपाणी’ला मराठीतही ‘ट्रम्पेट’च उच्चारले जावे आणि मतपत्रिकेतही त्याचा ‘ट्रम्पेट’ म्हणून उल्लेख केला जावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्य निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक चिन्हामध्ये ‘ट्रम्पेट’ हे मुक्त चिन्ह असल्याने तुतारी आणि पिपाणी या नामसाधर्म्यामुळे मतदारांचा गोंधळ निर्माण होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती.

‘पिपाणी’ हे चिन्हच रद्द केले जावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी होती. मात्र चिन्ह रद्द किंवा न गोठवता त्यातून निर्माण होणारा संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न आयोगाने केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे. ‘ट्रम्पेट’चे मराठीत भाषांतर तुतारी, पिपाणी, बिगूल असे केले जाते. यामुळेही मतदारांचा संभ्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एअर कंडिशनर, टीव्ही या निवडणूक चिन्हांचे भाषांतर न करता ते इंग्रजीत वापरले जातात त्याप्रमाणे ‘ट्रम्पेट’चे देखील मराठी भाषांतर न करता ‘ट्रम्पेट’ असाच उल्लेख मतपत्रिकेत आणि इतरत्र करण्याची सूचना आयोगाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रत्येकाला बसवावेच लागेल वीजेचे स्मार्ट मीटर! सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरावर प्रतियुनिट ८० रुपये सूट; भविष्यात जेवढा रिचार्ज तेवढीच वीज

आजचे राशिभविष्य - 08 डिसेंबर 2025

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात घाईत झटपट तयार होणारा कच्च्या बटाट्याचा नाश्ता, सोपी आहे रेसिपी

जमिनीची मोजणी आता अवघ्या २०० रुपयांत! ९० दिवसांत होणार मोजणी, अर्जासोबत संमतीपत्र, एकत्र कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक; अर्ज कोठे, कसा करायचा? वाचा...

शेतकऱ्यांना कधी मिळणार पीकविमा? मूग, उडीदाचे उत्पन्न निश्चित; आता सोयाबीन, तूर, मका, कांद्याचे काम अंतिम टप्प्यात, किती मिळणार पीकविमा, वाचा...

SCROLL FOR NEXT