

Morning Breakfast Recipe
Sakal
Instant Indian breakfast recipes for busy mornings: सकाळची नाश्त्याची वेळ म्हणजे घरातील सर्वात धावपळीचा क्षण! कामावर जाण्याची घाई, मुलांची तयारी, आणि त्यात नाश्ता पौष्टिकही हवा आणि झटपटही हवा. अशा वेळी कच्च्या बटाट्याचा हा झटपट तयार होणारा नाश्ता तुमच्यासाठी अगदी परफेक्ट पर्याय ठरू शकतो. बटाटे म्हणजे अनेक घरात नेहमी उपलब्ध असणारी भाजी. त्यातून काहीतरी पटकन आणि चविष्ट बनवता आलं, तर सकाळची चिंता कमी होते. कच्च्या बटाट्याचा हा नाश्ता चवीला जबरदस्त लागतोच, पण तयार होण्यासाठी लागणारा वेळही खूप कमी आहे. फक्त काही साधे मसाले, थोडंसं तेल आणि हाताशी असलेले बटाटे, एवढ्यातच तयार होतो एक स्वादिष्ट आणि भरपूर ऊर्जा देणारा नाश्ता. विशेष म्हणजे हा नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि डब्यातही देता येतो. हा पदार्थ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.