पुणे, ता. १० : ‘विकसित भारत २०४७’ आणि भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनविण्याच्या प्रवासाला गती देण्याच्या उद्देशाने ‘हिंदू इकॉनॉमिक फोरम’ (एचईएफ) पुणे जिल्हा शाखेतर्फे ‘एचईएफ पुणे इकॉनॉमिक कोलोक्वियम २०२५’ या उद्योजकता परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद मंगळवारी (ता. १४) बाणेर रस्ता येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे, अशी माहिती एचईएफ पुणेचे अध्यक्ष गौरव त्रिपाठी यांनी शुक्रवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सचिव शुभम कातंगळे, खजिनदार जयेश मीना, सहसचिव राहुल जोशी उपस्थित होते. या परिषदेत तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, वर्ल्ड हिंदू इकनॉमिक फोरमचे संस्थापक व ग्लोबल अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतील.
त्रिपाठी म्हणाले, ‘‘दूरदर्शी नेते, उद्योगपती, उद्योजक, धोरणकर्ते आणि विचारवंत यांना एका व्यासपीठावर आणत ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय ध्येयाच्या दिशेने देशाला जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्याचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्याचा या संमेलनाचा उद्देश आहे.’’
या परिषदेत ‘भारताची आर्थिक शक्ती घडवणे-लोकल टू ग्लोबल’ आणि ‘बदलत्या भू-राजकीय परिदृश्यात संरक्षण व हवाई क्षेत्रातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. यामध्ये बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, पिट्टी एन्टरप्रायजेसचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पिट्टी, चितळे ग्रुपचे वर्किंग पार्टनर गिरीश चितळे, पाहवा मेटलटेकचे व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार पाहवा, अलिकॉन कास्टालोय लिमिटेडचे स्ट्रॅटेजिक बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख व ‘एमसीसीआयए’च्या डिफेन्स कमिटीचे सदस्य हर्षवर्धन गुणे सहभागी होणार असल्याचे त्रिपाठी यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.