पुणे

प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे एकमेकांविरुद्ध आंदोलन महापालिका आयुक्त व माजी नगरसेवकांच्या हमरातुमरीचे पडसाद

CD

पुणे, ता. ७ ः पुणे महापालिकेत आयुक्त नवल किशोर राम आणि मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यात झालेल्या हमरीतुमरीचे आज शहरात पडसाद उमटले. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालिका भवनातील हिरवळीवर एकत्र येऊन, मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध केला तसेच असले वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर महापालिका भवनासमोर महाविकास आघाडीतर्फे प्रशासनाविरोधात आंदोलन करून अधिकाऱ्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत सभ्यपणे वर्तन करावे, असे बजावले.
महापालिकेत बुधवारी (ता. ६) आयुक्तांची बैठक सुरु असताना किशोर शिंदे अचानक आतमध्ये घुसल्याने आयुक्त व त्यांच्यात वाद झाला. त्यात शिंदे हे आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याने हे प्रकरण गंभीर झाले. याप्रकरणी शिंदे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे यांच्या या वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी आज (ता. ७) सकाळी महापालिकेच्या हिरवळीवर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलने करून राजकीय पुढाऱ्यांची ही असली दादागिरी सहन करणार नसल्याचे स्पष्ट केले. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त माधव जगताप यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी भाषणातून या घटनेचा निषेध केला. त्यानंतर दिवसभर काळ्या फिती लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम केले.
दुपारी मनसेचे आंदोलन सुरु असताना महाविकास आघाडीने या वादात उडी घेत प्रशासनावर टीका केली आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा देत आयुक्तांच्या विरोधात महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, बाबू वागस्कर आदी उपस्थित होते.

आंबेडकरी संघटनांचा आयुक्तांना पाठिंबा
आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटना, माजी नगरसेवकांनी आयुक्त नवल किशोर राम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आयुक्तांच्या बैठकीत घुसून गोंधळ घातल्यानंतर मनसेकडून या वादात मराठी- अमराठी असा रंग देण्याचा प्रयत्न केला, तो हास्यास्पद आहे. आयुक्त हे योग्य पद्धतीने महापालिकेत काम करत आहेत, असे आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना सांगितले. यावेळी माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक अविनाश साळवे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, राहुल डंबाळे, असित गांगुर्डे, युवराज बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 150 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

Pune Municipal Corporation : कोंढव्यातील आठमजली अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची धडक कारवाई

Baramati News : रेशीमकोषांची कोटीची उलाढाल; बारामती बाजार समितीत २२२ शेतकऱ्यांकडून २३ टनांची विक्री

Shalarth ID Scam: पुणे विभागीय आयुक्त करणार शालार्थ आयडीचा तपास; नव्या एसआयटीत पोलिस महानिरीक्षक, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक

Latest Marathi News Updates : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जाबाबत याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT